Kolhapur
KolhapurSaam Tv News

Kolhapur: छत्रपती राजाराम साखर कारखान्याला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

Rajaram Sugar Factory Boiler Explosion: कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या बॉयलरमध्ये भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या बॉयलरमध्ये भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच कोल्हापूर शहरातील अग्निशमन गाड्या घटानास्थळी रवाना झाल्या आहेत.

टर्बाईन पेटल्यानं आग क्षणार्थ पसरली. तसेच आगीचे लोट दुरवर पसरले. ही आग नेमकी कशामुळी लागली. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही आग सिंलेंडर स्फोटमुळे झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या बॉयलरमध्ये आग लागली आहे. शुक्रवारी सकाळी १०:४० च्या सुमारास ही आग लागली आहे. आगीत तीन सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऊस गळीत हंगाम सुरू असतानाच ही भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कारखान्यावरून राजकीय संघर्ष

राजकीय संघर्षामुळे हा कारखाना नेहमीच चर्चेत राहिला आहे. कोल्हापूर दक्षिणचे भाजप आमदार अमल महाडिक अध्यक्ष आहेत. महाडीक आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष राजाराम कारखान्यावरून दिसून आलाय. सभासद अपात्रतेच्या मुद्द्यावरून महाडीक आणि पाटील यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com