Pune News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्याला 3 नव्या महापालिकेची गरज का? वाचा पुणेकरांना याचा काय फायदा होणार

Why Pune needs three new municipal corporations चाकण, हिंजवडी आणि फुरसंगी या ठिकाणी नव्या महापालिका स्थापन होण्याची शक्यता आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था यासारखी नागरी कामे वेगवान होतील, निधी वाढेल, आणि समस्या जलद सुटतील.

Namdeo Kumbhar

Pune News : पुणे जिल्ह्यात 3 नव्या महापालिकांची निर्मिती होणार आहे. अजित पवारांनी नेमकी काय घोषणा केली? नव्या महापालिकांचा मुद्दा का चर्चेत आला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

पुण्यातील वाहतुक कोंडी आणि आयटी पार्कची दुरावस्था यावरून अजित पवारांनी अनेकदा अधिकाऱ्यांना आणि स्थानिक नेत्यांना झापलय़ं. अशातच 8 ऑगस्टला पहाटेंचं अजित पवारांचा ताफा चाकणमध्ये दाखल झाला..पवारांनी चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. या परिसरात एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळे साडेतीन लाखाहून अधिक कर्मचारी या ठिकाणाहून ये-जा करत असतात..त्यामुळे वाहतुक कोंडी इथे नेहमीचीच असते..केवळ चाकणच नव्हे तर हिंजवडी फुरसंगी हा परिसर ही विस्तारत चालला आहे..त्यामुळेच अजित पवारांनी पुण्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याचं सुतोवाच केलयं...

याआधी ठाणे महापालिकेतून मीरा-भाईंदर महापालिका, उल्हासनगर महानगरपालिका, वसई विरार महापालिका अशा महापालिकांची राज्यात निर्मिती झाली. महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना काय फायदा होतो हे पाहूयात..

रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणीव्यवस्था यासारख्या सोयीसुविधाची कामे वेगवान

राज्य आणि केंद्र सरकारकडून अधिक निधी मिळतो

स्वतंत्र आणि जबाबदार प्रशासकीय यंत्रणा पालिकेसाठी कार्यरत

नागरी समस्या जलद गतीनं सोडवण्यास मदत

दरम्यान चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यानं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावलं आणि सगळी वाहतूक सुरु करण्याचे आदेश दिले. एकूणच महापालिकांच्या निर्मितीनंतर पुण्यातील वाहतुक कोंडीसह इतर महत्त्वाच्या नागरी समस्या सुटतील का? हे पाहणं महत्वाचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT