सर्वात मोठा निर्णय! 5 ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी ५ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

महाराष्ट्रातील भीमाशंकर (पुणे), घृष्णेश्वर (छ. संभाजीनगर), त्र्यंबकेश्वर (नाशिक), औंढा नागनाथ (हिंगोली), परळी वैजनाथ (बीड) या 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी एकूण ₹880 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
CM Deevndra fadanvis
CM Deevndra fadanvis Saam TV News Marathi
Published On
Summary
  • राज्यातील पाच ज्योतिर्लिंग विकासासाठी स्वतंत्र IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती.

  • प्रथमच अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना धार्मिक ठिकाणांच्या विकासासाठी जबाबदारी.

  • कोट्यवधी रुपयांचे आराखडे मंजूर, वेळेवर अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्णय, अहवाल थेट मुख्यमंत्र्यांना.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यासाठी पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रथमच निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील.

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग व त्यांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त अधिकारी पुढीलप्रमाणे –

श्री क्षेत्र भीमाशंकर (जि.पुणे) – सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा.,

श्री. क्षेत्र घृष्णेश्र्वर (जि. छत्रपती संभाजीनगर) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी.

श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय.

श्री. क्षेत्र औंढा नागनाथ (जि. हिंगोली) – वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला.

श्री. क्षेत्र परळी वैजनाथ (जि. बीड) – इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज.

CM Deevndra fadanvis
पुण्याच्या रूग्णालयात गोंधळ, पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या, शिंदेंच्या शिवसेनेच्या ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

कोणत्या ज्योतिर्लिंगांसाठी किती रूपयांचा निधी ?

या पाच ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना उच्चाधिकारी समित्यांच्या बैठकांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी शासन निर्णय देखील काढण्यात आले आहेत. त्यानुसार भीमाशंकर तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यातील १४८ कोटी ३७ लाख रुपयांच्या सुमारे ११ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. घृष्णेश्र्वर तीर्थ क्षेत्र विकास आराखडा १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा आहे. त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील २७५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५ कोटी २१ लाख रुपयांचा आहे. तर परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील २८६ कोटी ६८ लाख रुपयांच्या ९२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

CM Deevndra fadanvis
IT कर्मचाऱ्याला बलात्कार प्रकरणात अडकवलं, RBL बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं ब्लॅकमेलिंगचं षडयंत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com