पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
व्यवस्थापकावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या आणि धक्काबुक्की झाली.
महिला कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्याचा आरोप.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ४० जणांविरोधात गुन्हा दाखल.
Political leaders create ruckus in Pune hospital : कोरेगाव पार्क येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये गोंधळ घालणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिंदे सेनेचे पुणे शहरातील पदाधिकारी अजय भोसले यांच्यासह सुमारे ३० ते ४० जणांचा समावेश आहे.
३१ जुलै रोजी अजय भोसले यांनी आपल्या समर्थकांसह बेकायदेशीररीत्या जमाव जमवून रुबी हॉस्पिटलसमोर गोंधळ घातला. जमावाने हॉस्पिटलच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकून मारल्या. याशिवाय महिला आरोपींनी – आशा ओव्हाळ, सुनिता भालेराव आणि गीता गोपाले – संबंधित व्यवस्थापक अधिकाऱ्याच्या अंगावर धाव घेत त्यांचे जॅकेट ओढून धक्काबुक्की केली.
फक्त एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर संबंधित अधिकाऱ्याला धमकी देत असे म्हटले गेले की, “तुमच्या नावाने पोलिसात खोट्या तक्रारी दाखल करू, ॲट्रॉसिटी लावू.” या धमक्यांमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी कर्नल रवी कुमार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे अजय भोसले व इतर आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.