Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: खासदार अमोल कोल्हे राजीनामा का देणार होते? अजित पवारांनी उघड केलं गुपित

Amol Kolhe Resign: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाण्यावर आता शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आलेत. अजित पवार यांनी शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. खासदार कोल्हेंवर टीका करताना अजित पवार यांनी त्यांच्या राजीनाम्याचं गुपित उघड केलं.

Bharat Jadhav

Ajit Pawar Talk on Amol Kolhe resign in Pune :

'मी शिरूर लोकसभा क्षेत्रात आपला दौरा सुरू केला आहे, त्यामुळे शिरूर लोकसभा क्षेत्रात मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार म्हणजे आणणारच, असा दावा परत एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी खासदार अमोल कोल्हे हे राजीनामा का देणार होते, याचं गुपित उघड केलं.. (Latest News)

या दौऱ्यात अजित पवार (AJit Pawar) यांनी खासदार (MP) अमोल कोल्हेंवर(Amol Kolhe) निशाणा साधला. खासदार कोल्हे यांच्या राजीनाम्याविषयी, मी हे बोलणार नव्हतो. पण निवडणुका आल्यानं यांना उत्साह आल्याने ते पदयात्रा काढत असल्याचा टोला अजित पवार यांनी गुपित उघड करताना लगावला. अमोल कोल्हे यांना खासगीत विचारा की, त्यांना पक्षात कोणी घेतलं, त्यांना तिकीट कोणी दिलं.

मात्र निवडून आल्यानंतर तेच मला वारंवार राजीनामा देण्याचा बोलत होते, त्यांनी ज्याप्रकारे शिरूर लोकसभा क्षेत्रातील ६ मतदारसंघात जनसंपर्क ठेवायला हवा होता. परंतु तशा प्रकारचा जनसंपर्क त्यांनी ठेवला नाही. त्यांनी पदयात्रा सुरू केल्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी कोल्हेंसाठी जिवाचं रान केलं. पण मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केलं.

मावळ लोकसभा क्षेत्रात विरोधकांना उमेदवार मिळत नाही आहेत. म्हणून ते आमच्या पक्षात असलेल्या उमेदवारांशी चर्चा करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीवर केली आहे.

शिरूरमध्ये आपला गटाचा नेता निवडून आणणार असा निर्धार अजित पवारांनी केलाय. तर दुसरीकडे अमोल कोल्हेंनी त्याचा निर्धार कायम ठेवलेला दिसत आहे. अजित पवारांच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणार का असा प्रश्न केल्यानंतर कोल्हे म्हणाले, मी शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. शिरूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी केलं. निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय शरद पवार घेतील असं कोल्हे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT