Prof. Hari Narke
Prof. Hari Narke Saam TV
मुंबई/पुणे

Pune Latest News: पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमात गणपती अथर्वशीर्ष; विचारवंतांचा का होतोय विरोध?

वृत्तसंस्था

प्राची कुलकर्णी, पुणे

Pune Latest News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणपती अथर्वशीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र विद्यापीठात गणपती अथर्वशीर्ष शिकवण्याचे कारण काय? असं म्हणत अनेकांनी त्याला विरोध केला आहे. (Professor Hari Narke Latest News)

दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि पुणे (Pune) विद्यापीठाचा संस्कृत विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यानुसार उपलब्ध असलेले व्हिडिओज पाहून लोकांनी त्यावरची प्रश्नावली सोडवणे अपेक्षित आहे. ही प्रश्नावली सोडावलेल्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांना १ गुण मिळणार आहे. मात्र हा अभ्यासक्रम विद्यापीठात असण्याची गरज आहे का? असा सवाल विचारत लेखक हरी नरके (Hari Narke) यांनी याला विरोध केला आहे.

अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा आणि संविधानामध्ये विज्ञाननिष्ठ असलेल्या आपल्या राज्यात आणि देशात विद्यापीठाने याला संलग्न होण्याची गरज काय? असा सवाल आता विचारला जातो आहे. दरम्यान यात कोणताही धार्मिक अॅंगल नसून फक्त संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी हा अभ्यासक्रम आहे असं स्पष्टीकरण दगडूशेठ हलवाई ट्रस्टने दिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज्यात ज्यांनी भाजप रुजवली त्या प्रमोद महाजनांची मुलगी पूनम यांना तिकिटी का दिलं नाही? ठाकरेंचा PM मोदींना सवाल

Ghatkopar Hoarding Collapsed : 'घाटकोपरचा तो अपघात नाही, तर...', होर्डिंग दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Today's Marathi News Live : ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

S Jaishankar: कोणाच्या तरी चुकीमुळे काश्मीरचा भाग गमावला; परराष्ट्रमंत्र्यांनी नेहरूंवर साधला निशाणा

Janhvi Kapoor : जान्हवीचं मनमोहक सौंदर्य; घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते क्लिन बोल्ड!

SCROLL FOR NEXT