Ranbir Kapoor : 'पंचायत' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; थेट रणबीर कपूरसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार, चित्रपटाचे नावही आले समोर

Ranbir Kapoor-Ramayana : रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाचे मोठे अपडेट समोर आले आहे. 'पंचायत' फेम अभिनेता 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे.
Ranbir Kapoor-Ramayana
Ranbir Kapoorsaam tv
Published On
Summary

रणबीर कपूर लवकरच 'रामायण'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पंचायत' फेम अभिनेता 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे.

'पंचायत' फेम अभिनेता रणबीर कपूरसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रामायण'मुळे चांगला चर्चेत आहे. 'रामायण' चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. नितेश तिवारी यांचा बिग बजेट चित्रपटात एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. ज्यामुळे चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रामायण' मध्ये कुंभकर्णाची भूमिका करण्यासाठी 'पंचायत' फेम अभिनेता फैसल मलिकची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी बॉबी देओलचे नाव सुचवण्यात आले होते. फैसल मलिक 'पंचायत' मध्ये प्रल्हाद पांडेची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. फैसल मलिक आजवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. फैसल मलिकच्या 'रामायण'मधील एन्ट्री बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र सोशल मीडियावर फैसल मलिकच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

'रामायण' स्टार कास्ट

रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारत आहे, तर साई पल्लवी देवी सीतेची भूमिका साकारणार आहे. केजीएफ स्टार यश चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल आणि रवी दुबे अनुक्रमे हनुमान आणि लक्ष्मणची भूमिका साकारणार आहेत. काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंह मंदोदरी आणि शूर्पणखा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अरुण गोविल, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, शीबा चड्ढा आणि इंदिरा कृष्णन हे देखील 'रामायण' चा भाग असणार आहेत. 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीत आणि चित्रपटाचा दुसरा भाग 2027 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

फैसल मलिक कोण?

फैसल मलिक हा प्रसिद्ध अभिनेता आहे. आपल्या दमदार अभिनयाने तो भूमिकेत जीव टाकतो. 'पंचायत' या वेब सीरिजच्या चारही सीझनमध्ये प्रल्हाद चाचा या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. या भूमिकेत फैसलने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खूप हसवले तर कधीकधी भावनिक सीन करून रडवले देखील आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर यांच्या 'सुबेदार' (Subedaar) या चित्रपटात फैसलने 'सॉफ्टी भैया' ही महत्त्वाची भूमिका देखील साकारली आहे.

Ranbir Kapoor-Ramayana
Bigg Boss Marathi 6 : प्राजक्ता शुक्रेने बिग बॉसला ठोकला रामराम, 'त्या' एका चुकीने थेट घराबाहेर जावे लागले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com