Nokia SmartPhone: काय सांगता? चक्क ५९ रुपयांत मिळतोय नोकियाचा दमदार स्मार्टफोन! कुठून घ्याल पाहा...

Best Nokia SmartPhone In Cheapest Price: तर हा स्मार्टफोन केवळ ५९ रुपयांत कसा आणि कुठून मिळेल यासाठी ही बातमी सविस्तर वाचा.
Nokia C21 Plus
Nokia C21 Pluswww.nokia.com
Published On

Best Nokia SmartPhone: नोकिया ब्रॅंड म्हटलं की डोळे झाकून विश्वास ठेवता येईल असा म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. ९० च्या दशकातले नोकियाचे फोन आता २०२२ मध्ये स्मार्ट झाले आहे. नोकियाने आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया सी २१ प्लस (Nokia C21 Plus) असं हा नोकियांचा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ एकोणसाठ रुपयांत (59 Rupees) मिळू शकतो. तर हा स्मार्टफोन केवळ ५९ कसा आणि कुठून मिळेल यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. (Nokia Latest Smartphone)

Nokia C21 Plus
Smartphone Overuse : स्मार्टफोनचा अतिवापर करताय ? उद्भवू शकतात आरोग्याच्या 'या' 6 समस्या

तर नोकियाचा हा स्मार्टफोन नोकिया (Nokia) कंपनीने ११,९९९ रुपयांच लॉन्च केला होता. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन केवळ ९७९९ रुपयात मिळत आहे. या व्यतिरिक्त फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरही आहे, (Flipkart Offer: Nokia C21 Plus Exchange Offer) त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते. हा फोन खरेदी करण्यासाठी जर फ्लिपकार्टवर एक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरलं तर ४९० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत ९३०९ रुपये इतकी होते. (Tech News In Marathi)

Nokia C21 Plus
Government Jobs 2022: स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वैद्यकीय शिक्षण विभागात ४५०० पदांची भरती

Nokia C21 Plus वर ९२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन (Smartphone) बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळेल. पण ही ९२५० रुपयांची फुल ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एक्सेंज करत असलेल्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल. अशाप्रकारे जर तुम्ही संपूर्ण ऑफर मिळवण्यात यशस्वी झालात तर या फोनची किंमत केवळ ५९ रुपये इतकी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com