Sanjay Raut Latest News: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील ४० गावांसह सोलापूर आणि अक्कलकोटवरी दावा सांगितल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. अशात शिवसेनेचे खासदार यांनी या सगळ्या प्रकारासाठी भाजपला दोषी ठरवलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली वक्तव्य ही स्क्रिप्टेड असून शिवरायांच्या अवमानाचा विषय आणि राज्यातील इतर मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, भाजप पक्षाच्या नेत्यांकडून शिवरायांचा जो अपमान झाला आहे मग राज्यापाल कोश्यारी असतील, भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुदांशू त्रिवेदी असतील ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जी चिखलफेक केलीय त्यामुळे महाराष्ट्रभरात या सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
यावरचं लक्ष विचलीत व्हावं, महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईंनी केलेला हा प्रयत्न आहे जणेकरुन लोकांचं लक्षं विचलीत व्हावं. अन्यथा असं कधी होत नाही की, भाजपचा एखादा मुख्यमंत्री भाजपच्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यावर हल्ला करत नाही. भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे, त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री असं बोलणं म्हणजे हे स्क्रिप्टेट आहे.
शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावरुन लोकांचं चित्त विचलीत करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेलं हे स्क्रिप्ट आहे असं राऊत म्हणाले आहेत. यांना खोके दिले तर हे शांत बसतात असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. (Latest Marathi News)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. सांगली (Sangali) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनंतर आता बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.