BMC Election update Saam tv
मुंबई/पुणे

BMC Election : मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती का रखडली? कारण आलं समोर

BMC Election update : मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती रखडली आहे. या दोन्ही पक्षाची युती कुठे रखडली, जाणून घ्या.

Vishal Gangurde

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती रखडली

दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युती रखडल्याचे सांगण्यात आलं

दोघांची युती नेमकी कशामुळे रखडली, याचे कारण समोर आलंय

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची जोरदार चर्चा सुरु होती. काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या चर्चेची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अचानक दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युती रखडल्याचे सांगण्यात आलं. आता दोन्ही पक्षांची युती रखडण्याचं कारण समोर आलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की, वंचितकडून काँग्रेसकडे ७० जागांची मागणी करण्यात आली होती. दोन जागांवरून युती रखडली. काँग्रेसकडून नेत्याच्या नातेवाईकांसाठी जागा मागण्यात आल्या आहेत. तर त्याच दोन जागांवर कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी वंचित ठाम आहे'.

'वंचित बहुजन आघाडीकडून २० आणि ५० जागांच्या याद्या सादर करण्यात आल्या आहेत. ५० जागांवर चर्चा करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे. २० जागांवर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे. दोन जागांवर समाधानकारक चर्चा न झाल्यास वरिष्ठ निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

'२२७ पैकी ७० जागांवर वंचित काँग्रेससोबत युतीत लढण्यास तयार आहे. वंचितने युतीचा चेंडू आता काँग्रेसच्या पारड्यात टाकल्या आहेत, असेही सांगण्यात आलं आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, 'जिथे शक्य तिथे आघाडी करा, असा आदेश आहे. भाजपला आघाडी केलेले पक्ष सोडून आम्हाला समविचारी पक्षाशी आघाडी करण्याच्या सूचना दिलेत. मुंबई येथे देखील स्थानिक नेत्यांना अधिकार आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या अंतिम निर्णय होईल. जागा वाटपात आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकेल. प्रत्येकांनी दोन पाऊले मागे घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसानचा हप्ता २० जूनला जमा होणार का? महत्वाची माहिती आली समोर

Women Health: आई होण्यासाठी योग्य वय कोणतं? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

SCROLL FOR NEXT