Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Metro 14 : १८ हजार कोटी मंजूर, बदलापुरातून मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली विकासाची ब्लू प्रिंट, वाचा

Badlapur Metro Line 14 : बदलापूरमध्ये पुढील ३-४वर्षांत मेट्रो धावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मेट्रो लाईन १४ साठी १८ हजार कोटींचे टेंडर मंजूर झाले असून कंजूरमार्ग ते बदलापूर हा मार्ग विकसित होणार आहे.

Namdeo Kumbhar

When will Metro Line 14 start from Badlapur : पुढील ३ वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासाची ब्लू प्रिंट सांगितले. ते म्हणाले पुढील पाच वर्षांमध्ये बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल. मेट्रो 14 च्या कामासाठी 18 हजार कोटींचं टेंडर मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो पाचही बदलापूरपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी फडणवीस यांनी बदलापूरकरांना दिला.

बदलापूर-कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्राकडून मंजूरी मिळाली आहे. मुंबई लोकल ट्रेनला मेट्रोसारखे कोच लावणार आहोत. मेट्रोसारखे दरवाजे आणि एसी लोकल असेल. त्यात कोणतीही दरवाढ करणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी आहे. मला उणीधुणी काढायची नाहीत, बदलापूर शहर विकासाची ब्लू प्रिंट घेऊन आलो आहे. ज्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही ते उणीधुणी काढतात, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

बदलापूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही - फडणवीस

आम्हाला नगरपालिका खुर्च्या तोडण्यासाठी नाही तर परिवर्तन करण्यासाठी हवी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेला टोला लगावलाय. बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकींच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरमध्ये आले होते. या वेळेस कुळगांव-बदलापूर शहराच्या विकासासाठी पाठवलेला निधी मधल्यामध्ये कुठेही झिरपू नये, म्हणून भाजपला साथ द्या आपल्या विकासाची जबाबदारी आमची असेल, असं आश्वासन जाहीर सभेत दिलं. त्यांनी यावेळी MMRDAमधील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिका क्षेत्रासाठी गेल्या 10 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक घरात 24 तास पाणी देण्याचा मानसही बोलून दाखवला.

मेट्रो १४ मार्ग नेमका कसा असेल?

कांजूरमार्ग-बदलापूर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो ठाण्यातील इतर मेट्रो मार्गाला जोडण्याचा प्लॅन सरकारने केला आहे. ४५ किमीचा मार्ग पुढील ४ वर्षांत मार्गी लागेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी, एलबीएस मार्ग, चिकोली, शिळ फाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर या स्थानकांचा या मार्गावर समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. कांजूरमार्ग ते घणसोली पर्यंत भूमिगत, नंतर बदलापूर पर्यंत उन्नत असा मार्ग असेल, असेही सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाला १८ हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.

फायदा काय होणार ?

बदलापूर-कांजूरमार्ग या मार्गावर मेट्रो झाल्यास लोकल मार्गावरील गर्दीवर निंयत्रण येणार आहे. सर्वसामान्यांना गारेगार प्रवास करता येईल. त्याशिवाय मुंबई आणि बदलापूर या दोन शहरातील अंतर अतिशय कमी होईल. कमी खर्चात आलिशान प्रवासाची सोय होणार आहे. बदलापूरहून दररोज हजारो लोक मुंबईमध्ये कामासाठी येतात, त्यांना लोकलच्या गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यात मर्यादीत लोकल असल्याने वेळेचे गणितही कोलमडते. पण मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर बदलापूरकरांचा प्रवास आरामदायी तर होणार आहेच. त्याशिवाय गर्दीतून सुटका होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Crime: ६५ वर्षीय महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार; २४ वर्षांच्या तरुणाचं हैवानी कृत्य

Bank Loan: कर्ज घ्यायचंय? तर कॅरेक्टर ठेवा चांगलं; सिबिलसह तपासलं जाणार तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आजचा भाव काय? वाचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे ताजे दर

SCROLL FOR NEXT