महाराष्ट्राला आखाती युद्धाची धग, राज्यातील उद्योगधंदे 'गॅस' वर

Maharashtra Industries Crisis: आखाती देशांमधील युद्ध आता राज्यातील उद्योगांच्या मुळावर उठलयं.... राज्यातील उद्योग गॅस पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे संकटात सापडलेत? त्यामुळे उद्योगांवरील हे संकट राज्यातील तिजोरीवर कसा परिणाम करणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये,...
Factories in Maharashtra’s key industrial belts struggle as gas shortages disrupt production amid the ongoing Gulf conflict.
Factories in Maharashtra’s key industrial belts struggle as gas shortages disrupt production amid the ongoing Gulf conflict.Saam Tv
Published On

आखाती देशांतील युद्धाची झळ आता उद्योग क्षेत्रालाही बसतेय.. अवघ्या दहा दिवसांत राज्यातील गॅस पुरवठा खंडित झाल्यानं औद्योगिक कंपन्यांचं पार कंबरडं मोडलयं...अनेक औद्योगिक कंपन्यांकडे अवघ्या 24 ते 46 तासांचा गॅस साठा शिल्लक आहे...अशावेळी राज्याचं ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 पेक्षा जास्त कारखाने बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय...

दुसरीकडे पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातील सुमारे साडेसात हजार कंपन्या गॅसअभावी संकटात सापडल्या आहेत...तर ज्या कंपन्याची महिन्याची उलाढाल 40 लाख होती ती आता 20 लाखांवर आलीय...त्यात एका बाजूला कच्च्या मालाचे वाढते दर आणि दुसऱ्या बाजूला गॅसअभावी ठप्प होत असलेली यंत्रे यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत.

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची परिस्थितीही काही वेगळी नाही..इथल्या औद्योगिक पट्ट्यातल्या 400 हून अधिक कंपन्या बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत....नाशिकमधील अनेक कंपन्यांकडे फक्त 1 दिवसाचा गॅस पुरवठा शिल्लक आहे...राज्यातील कंपन्या गॅसअभावी बंद झाल्यास कामगारांवरही बेकारीची कुर्हाड कोसळणार आहे... त्यात आखाती देशांतील मिसाईल्सचे हल्ले थांबतील तेव्हा थांबतील, पण त्याचा परिणाम राज्यातील कामगारांच्या चुलीवर होऊ लागल्यानं नवं संकट उभं राहिलयं...जर केंद्र सरकारने उद्योगांसाठीचा गॅस कोटा तातडीने पूर्ववत केला नाही, तर येत्या 48 तासांत महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर मोठा 'ब्लॅकआउट' पाहायला मिळू शकतो....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com