weather updates imd issues orange alerts for mumbai pune thane konkan marathwada and vidarbha Maharashtra Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert: मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

Satish Daud

Maharashtra Weather News Today

गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर राज्यात पावसाचा जोर वाढला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

हवामान खात्याने आज मुंबई, पुणे ठाणे, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा (Heavy Rain)  अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

रविवारी आणि सोमवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी (Maharashtra Rain) बरसल्या.

त्याचबरोबर मुंबईसह उपनगरातही पावसाने सोमवारी अधून मधून हजेरी लावली. दुसरीकडे कोकणात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार बँटिंग सुरुच ठेवली. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली.

आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?

हवामान खात्याने आज म्हणजेच मंगळवारी दुपारी किंवा संध्याकाळी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा (Rain Updates) इशारा दिला आहे. याशिवाय उपनगरात देखील पावसाच्या सरी बरसणार आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्र आणि इतर भागात मेघगर्जनेसह पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT