आयसीसीच्या वनडे विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वच संघांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. अशातच स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी काही सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आज म्हणजेच मंगळवारी (3 ऑक्टोबर) टीम इंडियाचा सामना नेदरलँडविरोधात होणार आहे. मात्र, या लढतीपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)
सराव सामन्यात यापूर्वी भारतीय संघाचा लढत गुवाहाटीच्या मैदानावर इंग्लंडसोबत होणार होती. मात्र, ऐनवेळी या सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यामुळे नाणेफेक झाल्यानंतर हा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध सराव करता आला नाही.
आता टीम इंडियाचा सामना नेदरलँडविरुद्ध तिरुवनंतपूरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियम होणार आहे. मात्र, पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यावर देखील पावसाचे सावट असून आज तिरुवनंतपूरम येथे 90 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यापूर्वी तिरुवनंतरपूरम येथे नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये सराव सामना झाला होता. मात्र, तेव्हा देखील ऐनवेळी पावसाने खोडा घातला. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. आता भारताच्या आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट असून 3 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपूरम येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडले असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यामुळे भारतीय संघाचा दुसरा सराव सामना देखील पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. जर असे झाल्यास ही टीम इंडियासाठी वाईट बातमी असेल, कारण वर्ल्डकपसारखी महत्वाची स्पर्धा तोंडावर असताना कुठल्याही सरावाशिवाय मैदानात उतरणे टीम इंडियासाठी घातक ठरू शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.