Mumbai Water Supply
Mumbai Water Supply Saam Tv
मुंबई/पुणे

Water Supply : मुंबईतील 'या' शहरांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद; जलवाहिनी बदलण्याच्या कामाला वेग

Ruchika Jadhav

मुंबईमध्ये सध्या काही ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी (२ मे) रात्री १० ते शुक्रवार (३ मे) रात्री १० या वेळेत पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे बुधवारीच जास्तीचा पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतलं आहे. त्यामुळे पाणी बंद असलेल्या २४ तासांत जलवाहिनीचे अलगीकरण करण्यात येणारे. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा असेल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

  • गांधी नगर, संजय नगर, लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, , सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव, बंदर पखाडी, भाबरेकर नगर या परिसरात शुक्रवारी ३ मे रोजी पाणी येणार नाही.

  • जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत या परिसरात देखील ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

  • चारकोप म्हाडा सेक्टर – ०१ ते ०९ मध्ये ३ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णता बंद असणारे.

  • आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम), महावीर नगर, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, म्हाडा एकता नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण येथे गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT