Navi Mumbai Water Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Water Cut News: नवी मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन!

Navi Mumbai Latest News : नवी मुंबईतील काही भागांमध्ये येत्या 10 आणि 11 एप्रिल म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी पाणी पुरवठा होणार नाहीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांसाठी (Navi Mumbai) ही बातमी खूपच महत्वाची बातमी आहे. ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईकरांना (Navi Mumbaikar) पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईतील काही भागांमध्ये येत्या 10 आणि 11 एप्रिल म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी पाणी पुरवठा होणार नाहीये.

जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईत या दोन दिवस पाणीपुरवठा खंडीत (Water Cut) केला जाणार आहे. अशामध्ये नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरिता स्थलांतरीत करण्याचे काम केले जाणार आहे. कळंबोली येथे एक्स्प्रेस वे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक ती कामं केली जाणार आहेत.

त्यासोबतच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल - दुरुस्तीची आणि इतर कामे करण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या या वेगवेगळ्या कामांमुळे नवी मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे.

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे, 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दुस-या दिवशी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तासांसाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढचे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तर 11 एप्रिल रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने कमी दाबाने केला जाणार आहे, याची नोंद नवी मुंबईकरांनी घ्यावी.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि कामोठे, खारघर या भागातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा करुन ठेवावा आणि पाण्याचा जपून करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगर पालिकेने केले आहे. तसंच, पाणी कपातीच्या काळामध्ये नागरिकांनी महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे देखील महापालिकेने सांगितले आहे.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अमरावती जिल्ह्यातील काय स्थिती, कुणाला आघाडी?

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT