Woman stomach tumor saam tv
मुंबई/पुणे

Woman stomach tumor: ८ दिवस उलट्या, पीरियड्समध्ये त्रास, डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढली १० किलोची गाठ, नेमकं काय झालं होतं?

10 kg tumor removed woman: मुंबईतील ४० वर्षीय मीन सोलंकी यांच्या पोटात एक मोठी गाठ असल्याचं आढळून आलं होतं. ही गाठ त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांनी कठीण शस्त्रक्रिया करत १०.४ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढून टाकली.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालयातील डॉक्टरांनी एक कठीण सर्जरी करत महिलेचे प्राण वाचवले आहेत. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात राहणार्या ४० वर्षांच्या अविवाहित मीन सोलंकी यांच्या पोटात गेल्या अनेक महिन्यांपासून एक मोठी गाठ वाढत होती. ही वाढत असलेली गाठ त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत होती.

डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आढळून आलं की, की ही गाठ आंत, यकृत, फुफ्फुसं आणि हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर दाब निर्माण करू लागली होती. सेंट जॉर्ज रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागातील डॉक्टरांच्या पथकाने चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेत १०.४ किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढली. सध्या मीन सोलंकी यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना योग्य तो आहार आहार दिला जातोय.

असं झालं गाठीचं निदान

सुमारे दीड वर्षांपूर्वी मीन यांना एका किरकोळ अपघातात टेबलचा कोपरा पोटावर लागला होता. त्यानंतर त्यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. यावेळी सुरुवातीला औषधोपचाराने त्रास थोडा कमी झाला. मात्र त्यानंतर त्यांच्या पोटाचा आकार वाढत गेला.

इतकंच नाही तर त्यांना मासिक पाळीतही त्रास होऊ लागला. मे महिन्यात परिस्थिती इतकी बिघडली की मीन यांना जेवण जेवण्यासही त्रास होऊ लागला. सलग आठ दिवस उलट्या होत होत्या. अशक्तपणाही इतका आला की, त्या उठूही शकत नव्हत्या. अखेर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं गेलं.

गाठ फुटण्याचा होता धोका

रूग्णालयातील डॉक्टरांनी अधिक तपासणी केली असता दिसून आलं की, मीन यांच्या पोटात एक अतिशय मोठी गाठ आहे, जी शरीरातील अनेक अवयवांशी चिकटलेली असून ती कधीही फुटण्याचा धोका होता.

सर्जरीचं नेतृत्व सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या युनिट हेड व वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी केलं. त्यांच्या सोबत ऑन्कोसर्जन डॉ. कोरेश, डॉ. शुभांगी आणि भूलतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा सोनकांबळे व डॉ. रूची यांचा सहभाग होता. चार तासांच्या प्रयत्नांनंतर ही धोकादायक गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मीन यांना दोन दिवसांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं.

डॉ. राजश्री कटके यांच्या मते, “मीन शस्त्रक्रियेसाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हत्या. प्रथम आम्ही त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची समुपदेशन केलं. त्यानंतर ही क्लिष्ट सर्जरी त्यांच्यावर केली.”

मीन यांचे भाऊ रमेश सोलंकी यांनी सांगितलं की, “डॉक्टर हे देवापेक्षा कमी नाहीत. आम्ही माझ्या बहिणीला जवळजवळ गमावलं होतं, पण डॉक्टरांनी तिला नवजीवन दिलंय.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT