Thyroid Awareness: मुलांमध्ये थायरॉईडची समस्या वाढतेय का? जाणून घ्या लक्षणे आणि काळजी घेण्याचे उपाय

Hypothyroidism In Children: मुलांमध्ये थायरॉईडची समस्या अनेकदा जन्मजात असते, मात्र काही वेळा ती मोठेपणात किंवा वयानुसार हळूहळू विकसित होऊ शकते, याची पालकांनी नोंद घ्यावी.
Thyroid Awareness
Thyroid Awarenessfreepik
Published On

अलिकडच्या काळात थायरॉईडचा त्रास लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे आणि तो केवळ प्रौढांपुरता मर्यादित नसून मुलांनाही होऊ शकतो. अनेकदा आपण हा आजार मोठ्यांमध्येच दिसतो असे समजतो, पण प्रत्यक्षात तो लहान मुलांमध्येही आढळतो. थायरॉईड शरीरातील अनेक क्रियांवर परिणाम करतो आणि वेळेत निदान न झाल्यास तो गंभीर रूप धारण करू शकतो.

थायरॉईडचा त्रास मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हा आजार सामान्य बनत चालला आहे. अंदाजानुसार दर १,००० मुलांपैकी सुमारे ३७ मुलांना थायरॉईड होतो. वेळीच निदान व उपचार न केल्यास हा आजार त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर मोठा परिणाम करू शकतो. चला जाणून घेऊया त्यामागची कारणं आणि संभाव्य दुष्परिणाम.

Thyroid Awareness
Mobile Selling Tips: जुना मोबाईल विकण्यापूर्वी 'या' ४ स्टेप्स फॉलो करा, अन्यथा होऊ शकते मोठी अडचण

थायरॉईड आणि त्याचे धोके

थायरॉईड ही घशाच्या पुढील बाजूस असलेली फुलपाखराच्या आकाराची एक महत्त्वाची ग्रंथी आहे, जी चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स निर्माण करते. या हार्मोन्सचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होते. मुलांमध्ये ही समस्या बहुतेक वेळा जन्मतःच दिसून येते, मात्र काही प्रकरणांमध्ये ती वयानुसार किंवा वाढीच्या टप्प्यांवरही विकसित होऊ शकते. यासाठी वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

Thyroid Awareness
Tea And Coffee Effects: चहा आणि कॉफीची वाढती सवय आरोग्यास कशी हानिकारक ठरू शकते? जाणून घ्या

मुलांमध्ये थायरॉईड कसे ओळखावे?

मुलांमध्ये थायरॉईडची लक्षणे त्यांच्या वयानुसार वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे पालकांनी सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हायपोथायरॉईडीझम म्हणजेच हार्मोन्सची कमी निर्मिती झाल्यास बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, थकवा, सतत थंडी वाटणे, केस गळणे, मुलींमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, तसेच स्मरणशक्ती व एकाग्रतेत अडचणी अशी लक्षणे दिसू शकतात. यावर वेळीच निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Thyroid Awareness
Foot Care In Monsoon: पावसात पाय कोरडे होण्याची समस्या? घरच्या घरी करता येणारे 'हे' सोपे उपाय जाणून घ्या

या आजारापासून मुलांना कसे वाचवायचे?

मुलांना थायरॉईडपासून वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. डॉक्टरांच्या सल्ल्याने नवजात बाळाची TSH आणि T4 चाचणी वेळेवर करावी, ज्यामुळे जन्मताच असलेली थायरॉईड समस्या ओळखणे सोपे होते.

- थायरॉईड ग्रंथी नीट कार्य करण्यासाठी आयोडीन अत्यावश्यक आहे, त्यामुळे आहारात आयोडीनयुक्त मीठ आवर्जून समाविष्ट करा.

- मुलांच्या वाढीवर आणि वागणुकीवर लक्ष ठेवा; कुठलीही अडचण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.

- कुटुंबात एखाद्याला थायरॉईडची समस्या असेल, तर मुलासाठी अधिक जागरूक राहा आणि आवश्यक ती काळजी घ्या.

- मुलांना व्हिटॅमिन A-D आणि लोहयुक्त संतुलित, पौष्टिक आहार देणे थायरॉईडसाठी फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com