Foot Care In Monsoon: पावसात पाय कोरडे होण्याची समस्या? घरच्या घरी करता येणारे 'हे' सोपे उपाय जाणून घ्या

Rainy Day Tips: पावसामुळे पाय ओले होऊन कोरडे, खरडे वाटत असतील, तर काही सोपे घरगुती उपाय करून या त्रासापासून सहज दिलासा मिळवता येतो.
Foot Care In Monsoon
Foot Care In Monsoonfreepik
Published On

पावसाळ्याच्या आगमनाने पाय ओले होणे ही निसर्गाची एक सामान्य बाब झाली आहे. या ऋतूत अनेक ठिकाणी पाण्याचा साच होता असल्यामुळे, कितीही काळजी घेतली तरी पाय ओले होण्यापासून वाचता येत नाही. घाणेरड्या आणि थंड पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे पायांवर कोरडेपणा आणि खाज सुटण्यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे पायांची योग्य काळजी घेणे गरजेचे ठरते.

जर पायांची योग्य काळजी घेतली नाही, तर टाच तुटू लागतात आणि नखे कमकुवत होतात. अशा वेळी पायांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या ऋतूत पाय कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, जे तुम्हाला आराम देतील आणि पाय निरोगी ठेवतील.

Foot Care In Monsoon
PCOS Tips: PCOS शी झुंजत आहात का? नियंत्रित करण्यासाठी आहारात करा 'हे' ४ महत्वाचे बदल

नारळ तेलाची मालिश

नारळ तेल प्रत्येक घरात असते किंवा नसेल तर खरेदी करा. ते कोरड्या त्वचेला ओलावा देत अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही देतो. रात्री झोपण्यापूर्वी पायांना नारळ तेलाने मालिश करा आणि त्यानंतर झोपा. आठवड्याभरात याचा परिणाम दिसून येईल.

Foot Care In Monsoon
Skincare Tips: दररोज त्वचेवर परफ्यूम लावता? तुमच्या सौंदर्यावर व आरोग्यावर होतील दुष्परिणाम

कोरफड जेल लावा

कोरफड वेरा जेल त्वचेसाठी उपयुक्त असून पायांच्या कोरडेपणावरही फायदेशीर आहे. ताजे किंवा शुद्ध जेल वापरून पायांवर लावा. १५-२० मिनिटांनी धुवू शकता किंवा रात्रभर राहू द्या. केमिकलयुक्त जेल टाळा, अन्यथा समस्या वाढू शकतात. यामुळे त्वचा लवकर मऊ होते.

Foot Care In Monsoon
Kidney Health: किडनीचे आरोग्य सुधारा! निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ

मध लावा

मध त्वचेसाठी उपयुक्त असून कोरडेपणा दूर करण्यास मदत करतो. रात्री पाय स्वच्छ धुवून मधाचा थर लावा, थोडा वेळ ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे पायांची त्वचा मऊ आणि ओलसर राहते, तसेच कोरडेपणा कमी होतो.

मॉइश्चरायझर्स

आता बाजारात पायांसाठी विशेष मॉइश्चरायझर्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही दिवसातून दोनदा वापरू शकता. पाय कोरडे पडत असतील तर प्रत्येक धुतल्यावर मॉइश्चरायझर लावा. नियमित वापराने तुमचे पाय मऊ आणि नमीयुक्त होतील, त्यामुळे कोरडेपणाचा त्रास कमी होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com