Kidney Health: किडनीचे आरोग्य सुधारा! निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ

Kidney Care Foods: मूत्रपिंड हे शरीराचे नैसर्गिक फिल्टर असून ते विषारी पदार्थ, अतिरिक्त द्रव आणि कचरा बाहेर टाकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Kidney Health
Kidney Healthfreepik
Published On

हृदय, मेंदू आणि यकृताप्रमाणेच, शरीरातील मूत्रपिंड ही अत्यंत महत्त्वाची अवयव आहेत. ते रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रवपदार्थ फिल्टर करतात, मूत्र तयार करतात आणि विषारी पदार्थ बाहेर टाकतात. तसेच रक्तदाब आणि आम्ल संतुलन नियंत्रित करण्यात तसेच व्हिटॅमिन डी सक्रिय करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांचे कार्य सुरळीत राहते.

Kidney Health
PCOS Tips: PCOS शी झुंजत आहात का? नियंत्रित करण्यासाठी आहारात करा 'हे' ४ महत्वाचे बदल

बेरी

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी आणि क्रॅनबेरीसारख्या बेरींमध्ये जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढून जळजळ कमी करतात आणि मूत्रपिंडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

अंड्याचा पांढरा भाग

अंड्याच्या पांढऱ्या भागात इतर प्रथिन स्रोतांपेक्षा कमी फॉस्फरस आणि अधिक प्रथिने असतात, त्यामुळे ते मूत्रपिंडांसाठी उपयुक्त प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जाते.

Kidney Health
Foot Fungus: पावसाळ्यात 'पायांची बुरशी' कशी टाळायची? बुरशीपासून बचावासाठी उपयुक्त ४ उपाय

सफरचंद

सफरचंदात मुबलक अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असून ते मूत्रपिंडांना निरोगी ठेवतात. त्यातील पेक्टिन, विरघळणारे फायबर आणि कमी ग्लुकोज रक्ताभिसरण सुधारतात आणि मूत्रपिंडांवरील ताण कमी करतात.

पालेभाज्या आणि भाज्या

पालक, मेथी, केल, स्विस चार्ड आणि ब्रोकोलीसारख्या हिरव्या भाज्या मूत्रपिंडांसाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवतात. त्यामुळे त्यांचा दररोज आहारात समावेश करणे मूत्रपिंडाचे आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

लाल द्राक्षे

लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात, जे मूत्रपिंड आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि शरीरातील जळजळ कमी करण्यात मदत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com