Skincare Tips: दररोज त्वचेवर परफ्यूम लावता? तुमच्या सौंदर्यावर व आरोग्यावर होतील दुष्परिणाम
उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि त्यामुळे शरीरातून दुर्गंधी येण्याची शक्यता वाढते. यामुळे बहुतांश लोक परफ्यूमचा वापर करतात. परफ्यूममुळे ताजेपणा वाटतो आणि वास लपवण्यास मदत होते. मात्र उन्हाच्या प्रभावामुळे हा सुगंध काही वेळाने निघून जातो आणि वारंवार परफ्यूम लावण्याची गरज भासते. त्यामुळे योग्य पद्धतीने वापरणे महत्त्वाचे ठरते.
बर्याच लोकांना वाटते की परफ्यूम थेट त्वचेवर लावल्यास सुगंध अधिक काळ टिकतो, म्हणूनच तो मानेवर किंवा मनगटावर लावला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, त्वचेवर परफ्यूम लावणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते? यामुळे त्वचेची अॅलर्जी, जळजळ किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या याचे संभाव्य तोटे.
ऍलर्जीची शक्यता
त्वचेवर परफ्यूम लावल्यास त्यातील रसायनांमुळे पुरळ, खाज, लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते. काही स्वस्त परफ्यूममुळे ही समस्या अधिक गंभीर बनते, ज्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे असा वापर टाळा.
काळे डाग
तयार झाल्यानंतर परफ्यूम लावणे सामान्य आहे, पण लगेच बाहेर गेल्यास त्वचेला फोटोसेन्सिटिव्ह रिअॅक्शन होऊ शकते. यामुळे काळे डाग व पिगमेंटेशन निर्माण होऊन चेहऱ्याचा लूक बिघडू शकतो, त्यामुळे सावध रहा.
त्वचेचा कोरडेपणा वाढेल
त्वचेवर परफ्यूम लावल्यास त्यातील अल्कोहोल त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी करतो, ज्यामुळे त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते. दीर्घकाळ वापरल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते, त्यामुळे थेट वापर टाळा.
त्वचेवर जळजळ
मानेवर किंवा मनगटावर सतत परफ्यूम लावल्याने त्वचा संवेदनशील बनते आणि जळजळ, लालसरपणा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रोज एकाच ठिकाणी परफ्यूम लावणे टाळावे, अन्यथा त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते.
वृद्धत्वाची चिन्हे
स्वस्त परफ्यूममध्ये असलेली रसायने त्वचेच्या पेशींना हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे वेळेपूर्वी सुरकुत्या, सैलपणा निर्माण होतो. अशा परफ्यूमचा नियमित वापर त्वचेच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे टाळणेच योग्य.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.