Kalyan, Shankar Gaykar saam tv
मुंबई/पुणे

Vishwa Hindu Parishad : मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा अफझलखान कोण काका, मामा लागतो का ? शंकर गायकर

बॅनर लावणं गुन्हा असेल तर मग वाघनख कशाला आणता? अशी विचारणा देखील त्यांनी सरकारला केली आहे.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : आमच्या नामर्द सरकारचा तो अफजलखान बाप लागतो का ? पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्याना विचारावे अफजलखान आमचा काका मामा लागतो का ? ज्याने आमच्या आया बहिणी पळवल्या आणि मरवल्या कोण लागतो ताे ? असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांनी सरकारला केला आहे. (Maharashtra News)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षां पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त (vishwa hindu parishad hirak mahotsav) बजरंग दलाच्या (bajrang dal) वतीने काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रे दरम्यान आयोजिलेल्या सभेत गायकर बाेलत हाेते. कल्याण पाेलीस प्रशासनाने अफजलखान वधाचे पाेस्टर काढल्याने गायकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गायकर म्हणाले अफजलखान याचा वधाचा पाेस्टर लावणे हा काही गंभीर गुन्हा नाही. त्यामुळे ज्या अधिका-यांनी ही कारवाई केली त्याची गांभीर्याने सरकारने विचारणा केली पाहिजे. या पाेस्टरच्या माध्यमातून इतिहास जागवण्याचे काम बजरंग दलाने केलं आहे. अफजलखानाचा सरकारशी काय नातं आहे? असा सवाल उपस्थित करत अफजल खानाचा वध केला आहे म्हणूनच वाघ नख आणली जात आहेत. कारण वाघ नख ही शौर्याचं प्रतीक आहेत असेही गायकर यांनी स्पष्ट केले. बॅनर लावणं गुन्हा असेल तर मग वाघनख कशाला आणता? अशी विचारणा देखील त्यांनी सरकारला केली आहे.

सेक्युलरिझम त्यांनी आपल्या घरी ठेवावा

नवरात्रीत हिंदूंनाच परवानगी मिळावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली त्यानंतर विरोधी पक्षानि विश्व हिंदू परिषदेवर टीका केली. याबाबत बोलताना शंकर गायकर यांनी विरोधी पक्षाबद्दलच शंका आहे, गरबा ही देवीची उपासना आहे ,नऊ दिवस हिंदू आपल्या आईची उपासना करतो साधना करतो. या साधनेमध्ये अन्य धर्मीय येण्याचं काही कारणच नाही.

हा सेक्युलरिझम त्यांनी आपल्या घरी ठेवावा,यायचा असेल तर त्यांच्या बुरखाधरी भगिनी घेऊन याव्यात आम्ही त्यांचा सन्मान करू. आम्हाला मुसलमान हिंदू करायचाच नाहीये पण केवळ इथे येऊन या सणाला गालबोट लावणं या सणाला कुठेतरी वाईट दिशेला नेणं आणि हिंदूंची संस्कृती संपवण्याचा जो खुळचटपणा जो चाललेला आहे हा बंद झाला पाहिजे म्हणून बजरंग दलाने अनेक ठिकाणी आम्ही त्याला प्रतिबंध सुद्धा केलेला आहे असे गायकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना गायकर यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. आमचे प्रधानमंत्री उद्योगधंद्यांचे देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने टांझानियाला जातात ,तिथे धर्म आणण्याची गरज नाही ,नवरात्र हा साधनेचा काळ आहे, विश्व हिंदू परिषदेचा मुस्लिम व्यक्तीशी द्वेष नाही, आम्ही संविधानाचा सन्मान करतो, ते नवरात्रीत सन्मान करायला येत नाहीत नवरात्रीत आमच्या आई बहिणीचे छेड काढण्यासाठी येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्य देताना दहा वेळा विचार करायला पाहिजे.

या साधनेच्या काळामध्ये हिंदू समाजाने साधनेचा केले पाहिजे हे साधनेच व्यासपीठ आहे तिथे शांततेने साधनेचा आनंद घेतला पाहिजे आणि ते काय म्हणतात याहीपेक्षा आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी भारावलेलो आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे असे सांगितले असे बोलत राऊत यांच्यावर शंकर गायकर यांनी निशाणा साधला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT