Mumbai Virar News Saam Tv
मुंबई/पुणे

Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाईन मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

Mumbai Virar News : विरारमध्ये ब्लिंकिटमधून मागवलेल्या अंड्यांमध्ये अळ्या आढळल्या. शिवाय एक्स्पायरी डेट संपलेले खाद्यपदार्थ दिल्याने ग्रहकांचा संताप होत आहे.

Alisha Khedekar

विरारमध्ये ब्लिंकिटमधून मागवलेल्या अंड्यांमध्ये अळ्या

ग्राहकाने स्टोअर मॅनेजरला जाब विचारला

मॅनेजरने मान्य केली चूक

ऑनलाइन खाद्यसेवांवरील विश्वासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

तुम्ही देखील ऑनलाईन जेवण, किराणा माल, गृहउपयोगी वस्तू मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ब्लिंकिट, झोमॅटो, स्वीगी सारख्या कंपन्या घरपोच सेवा देतात म्हणून नागरिकांचा प्रवासाचा वेळ तसेच पैशांची बचत होते. मात्र असं असलं तरी या सेवा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अशीच एक घटना विरारमधून समोर आली आहे. शहरात ब्लिंकिट मधून ऑनलाइन मागवलेल्या अंड्यांमध्ये अळ्या निघाल्या आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये शुभम एमजी या तरुणाने काही खाण्यासाठी पदार्थ आणि अंडी ब्लिंकिंट या घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीतून मागवली होती. ही डिलिव्हरी काही क्षणात त्याच्या घरी पोहचली. मात्र पार्सल उघडताच शुभमच्या धक्कदायक बाब लक्षात आली. त्याने मागवलेल्या पॅकेट बंद खाण्याच्या पदार्थांचे एक्स्पायरी डेट निघून गेली होती. तसेच अंडी फोडल्यानंतर त्यात त्याला बारीक हालचाल करणाऱ्या अळ्या आढळल्या.

या घटनेनंतर शुभमला धक्का बसला. त्याने ब्लिंकिटला जाब विचारायला ब्लिंकिट स्टोरकडे धाव घेतली. तिथे जाऊन नागरिकांनी ब्लिंकिटच्या मॅनेजरला खडसावून विचारले असता, मॅनेजरने देखील स्वतःची चूक मान्य केली. या घटनेनंतर ब्लिंकिट विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान या विरोधात काय ठोस पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवाय नागरिकांना अशा पद्धतीने फसवलं जात असेल तर ही बाब गंभीर मानली जात आहे. नागरिकांनी अशा सेवांच्या कंपनींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तुम्ही देखील ऑनलाईन फूड मागवत असाल तर सावधान राहा. तुमची एक चूक आयुष्यावर बेतू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

Honeymoon Spot : कुठं कुठं जायाचं हनिमूनला? 'हे' आहे भारतातील बेस्ट लोकेशन, येथे जाताच स्वित्झर्लंड विसराल

SCROLL FOR NEXT