समृद्धी महामार्गावर मुंबई–नागपूर लक्झरी बसला आग
चालकाच्या सतर्कतेमुळे १४ प्रवासी सुरक्षित
बस पूर्णतः जळून खाक झाली असून मोठी वित्तहानी झाली
पोलिस तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर चालत्या बसने पेट घेतल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या बसमधून १४ जण प्रवास करत होते. मुंबईतील बोरीवली भागातून ही बस नागपूरकडे जात होती यादरम्यान समृद्धीमहामार्गावर बसने हळू हळू पेट घ्यायला सुरुवात केली. मात्र या दुर्घटनेत चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियमितपणे मुंबईतील बोरिवलीहून सुटणारी नागपूरकडे जाणारी लक्झरी बस रवाना झाली. मात्र शहापूर तालुक्यातील सरलांबे ब्रिज च्या पुढे चॅनल नंबर 663 जवळ येताच या चालत्या लक्झरी बस ने अचानक पेट घेतला. गाडी पेट घेत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने प्रसंगावधान राखत चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना खाली उतरवले.
चालकाच्या प्रसंगावधेतेमुळे कोणत्याही प्रवाशांना इजा झाली नाही आणि मोठी जीवित हानी टळली. बघताबघता संपूर्ण बस जळाली म्हणून उपस्थितांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दल घटनस्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. आगीच्या भक्षस्थानी असलेली बस जाळून खाक झाली होती.
दरम्यान सुदैवाने या बसमधून चालकासह ऐकून १४ जण प्रवास करत असलेले प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट असून पोलीस याचा सविस्तर तपास करत आहे. चालत्या गाडीला आग लागण्याच्या घटना सध्या वाढल्या असून ही बाब गंभीर आहे. समृद्धी मार्ग सुरु झाल्यापासून सततच्या घडामोडी सुरूच आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.