Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?

Amravati Crime News : अमरावतीत बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय श्रुती झेलेने आत्महत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली असून कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?
Amravati Crime NewsSaam Tv
Published On
Summary

अमरावती जिल्ह्यात बीए विद्यार्थिनी श्रुती झेलेने गळफास घेऊन आत्महत्या केली

ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडका गावात घडली

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे

पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

साताऱ्यातील फलटण तालुक्यात एका डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला. अशातच आता अमरावती मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. BA च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येने गावात खळबळ उडाली असून तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडका येथे राहणाऱ्या २१ वर्षीय श्रुती झेले ही धामणगाव रेल्वे मधील आदर्श महाविद्यालयात BA च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. मात्र घरी कोणी नसल्याचं पाहून तिने गळफास लावून आपलं जीवन संपवलं. श्रुतीच्या आयुष्यात असं काय घडलं ? जेणेकरून तिने हा मार्ग निवडला याचं अद्यापही कारण अस्पष्ट आहे.

Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?
Toranmal Hill Station : खानदेशचे सौंदर्य! तोरणमाळला दाट धुक्याची चादर,निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

श्रुतीला गळफास घेतल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. घडलेल्या घटनेसंदर्भात त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तडक श्रुतीच्या घरी धाव घेतली. श्रुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान श्रुतीने नेमकी आत्महत्या केली की हा घातपात आहे, याचा तपास अमरावती पोलीस करत आहेत.

Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?
Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, नेमकं काय घडलं?

साताऱ्यातील डॉक्टर तरुणीने का केली आत्महत्या ?

साताऱ्यातील फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीनं २४ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्यानं अगणित अत्याचार केले. याचा पुरावा म्हणून मृत्यूपूर्वी तिनं हातावर आत्महत्येचं कारण आणि त्याला कारणीभूत असलेल्यांची नावं लिहिली होती. या नोटनुसार, जनतेचा रक्षक म्हणवणारा एक पोलीस अधिकारीच तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. रक्षक म्हणून मिरवणाऱ्या राक्षसाने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. या छळाला कंटाळून डॉक्टर तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत जीवनाचा दोर कापला. दरम्यान या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com