विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर चार मुले समुद्रात वाहून गेली
दोन मुलांचे प्राण वाचवण्यात यश
दोन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू
अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल
मुंबईच्या विरार परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळच्या सुमारास चार मुले वाहून गेली. सुदैवाने २ मुलांना वाचवण्यात यश आले असून २ मुले अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून शोध मोहीम सुरु आहे. दरम्यान या घटनेनंतर किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या अर्नाळा समुद्राजवळ ही चार मुलं खेळत होती. अचानक आलेल्या जोरदार लाटांच्या तडाख्यात ते चौघेही समुद्रात वाहून गेले. या घटनेनंतर किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. समुद्रात वाहून गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांना तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
वेळेत मदत मिळाल्यामुळे या दोन्ही मुलांचे प्राण वाचले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इतर दोन मुले अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, बेपत्ता झालेली दोन्ही मुले नालासोपारा परिसरातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस, स्थानिक पोलीस प्रशासन तसेच जीवरक्षकांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली.
बोटींच्या सहाय्याने समुद्रात शोधकार्य सुरू असून किनाऱ्यालगतच्या भागातही तपास केला जात आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात समुद्र खवळलेला असतो आणि भरतीच्या वेळी पाण्यात उतरणे धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.