Virar Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Virar Accident : विरारमध्ये भीषण अपघात; भरधाव टेम्पोने चिरडल्याने २ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

Virar accident News : विरारमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. भरधाव टेम्पोने दोन वर्षांच्या चिमुरडीला चिरडल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही

विरार : राज्यात भीषण अपघाताचं सत्र सुरु आहे. विरारमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. विरारमध्ये टेम्पोने दोन वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिममेकडील डोंगरपाडा परिसरात दूध वाहून नेणाऱ्या पिकअप टेम्पोने दोन वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे. रिया सिंग असं या चिमुकलीचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास आत्माराम पार्क परिसरात इमारतीच्या गेटजवळ रिव्हर्स घेणाऱ्या दूधाच्या टेम्पोने धडक दिली. त्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातानंतर विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मद्यधुंद कारचालकाने चिरडल्याने झाला होता प्राध्यापिकेचा मृत्यू

काही महिन्यांपूर्वी विरारमध्ये एका भरधाव कारने प्राध्यापिक महिलेला चिरडलं होतं. या भीषण अपघातात प्राध्यापक महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कारचालकाला अटक केली होती. आत्मजा कसाट असे मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेचे नाव होते. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात शिकवायच्या. भीषण अपघातानंतर पोलिसांनी शुभम पाटील या चालकाला अटक केली होती. अपघातानंतर शुभम पाटीलचे मित्र-मैत्रिणी फरार झाले होते.

नांदेडमध्ये धावत्या मोटारसायकलने घेतला पेट

नांदेडमध्ये धावत्या मोटारसायकलने अचानक पेट घेतला. नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात ही घटना घडली. सत्यवान उमाटे हे आपल्या मोटारसायकलने नांदेड शहरात कामानिमित्त आले होते. शिवाजीनगर भागात त्यांच्या मोटारसायकलने अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु मोटारसायकल जाळून खाक झाली आहे .अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझविली. या घटनेने मात्र शिवाजीनगर भागात एकाच धावपळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

SCROLL FOR NEXT