Dombivli News : विरार-आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक; सरकारला दिला मोठा इशारा, कारण काय?

virar alibaug corridor project : विरार-आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पावरून शेतकऱ्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विरार-आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक; सरकारला दिला मोठा इशारा, कारण काय?
Dombivli News Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-विरार-आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पात डोंबिवलीजवळील भोपर गावातील सुमारे 100 शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. या प्रकल्पाने बाधित होणाऱ्या शेत जमिनीवर ज्या शेतकऱ्यांचा कब्जा आहे. त्या शेतकऱ्यांना सरकारने मोबदला द्यावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांनी मागणी करत जमिनीच्या बदल्यात मोबदला दिला नाही तर कल्याण प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

कल्याण-विरार आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पात डोंबिवलीजवळील भोपर गावातील जमिनी बाधित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांच्या नेतृत्वाखाली भोपर गावातील शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली.

यावेळी बाधित शेतकऱ्यांनी काही जागा दुसऱ्यांच्या नावावर असल्या तरी कब्जा पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा आहे, जे कब्जेदार आहेत. त्यांना मोबदला दिला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या प्रकल्पासाठी काही लोकांनी शेतकऱ्याला बाजूला सारून सावकाराला हाताशी धरुन स्वत:च्या नावे जागा केली आहे, अशा लोकांना सरकारनं धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, असे बाधित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

विरार-आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक; सरकारला दिला मोठा इशारा, कारण काय?
Kalyan Politics : झालं 'कल्याण'! विधानसभेआधीच ठाकरे गटात ठिणग्या; जिल्हाप्रमुखांचं पत्र व्हायरल

काही लोकांनी फसवणूक करुन जागा नावावर केली आहे. त्यांना मोबदला न देता शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विरार-आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक; सरकारला दिला मोठा इशारा, कारण काय?
Kalyan News: गणपत गायकवाड-महेश गायकवाड भिडले, त्याच जमिनीवरून पुन्हा राडा

आज शुक्रवारी प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे देखील ही मागणी केली आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही, तर कोपरगावातील बाधित शेतकरी प्रांत कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी दिला. याबाबत प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी वर्गाने माझ्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच त्यांचे निवेदनही स्वीकारले आहे. शेत जमिनीवर ज्या बाधित शेतकऱ्यांचा कब्जा आहे. त्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या हरकतीनुसार त्यांच्या हरकतीची रितसर सुनावणी घेतल्याशिवाय कोणालाही प्रकल्पाचा मोबदला दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com