Local Train  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Viral Video : "दोन्ही सीट आमच्या" कसारा लोकलमध्ये प्रवाशांच्या ग्रुपबाजीचा मनमानी कारभार; व्हिडिओ व्हायरल

Local Train News : कसारा ते कल्याण लोकलमध्ये प्रवाशांमध्ये सीट राखून ठेवण्यावरून मोठा गोंधळ उडाला. चाकरमान्यांच्या ग्रुपने “दोन्ही सीट आमच्या” असा दावा करत इतरांना बसू दिलं नाही. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Alisha Khedekar

  • कसारा लोकलमध्ये सीट राखून ठेवण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला.

  • चाकरमानी प्रवाशांच्या ग्रुपने दोन सीट्स बॅग ठेऊन अडवून ठेवल्या.

  • घटनेचा व्हिडिओ प्रवाशांनी मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला.

  • रेल्वे प्रशासनाकडून या प्रकारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून वेगवगळ्या कारणास्तव दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अनेक प्रवासी नेहमीच्या ठरलेल्या रेल्वेने प्रवास करत असताना त्यांची चांगली गट्टी जमते. या मैत्रीखातर ग्रुप मधील एखादा सदस्य उशिरा आला तर त्याच्यासाठी सीट राखून ठेवली जाते. मात्र या गटबाजीचा फटका इतर प्रवाशांना बसतो. उपस्थित नसलेल्या व्यक्तीसाठी एक सीट राखून ठेवली जाते यावरून अनेकदा लोकलमध्ये भांडणाचे सुर टोकाला जातात. अशीच एक घटना आज सकाळी कसारा ते कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये घडली.

आज पहाटे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या ६:१० च्या लोकलमध्ये एक गंभीर प्रकार घडला. चाकरमान्यांच्या एका नेहमीच्या ग्रुपने, सीट राखून ठेवण्यासाठी इतर प्रवाशांना उघडपणे मज्जाव करत दादागिरी केली. या गटातील एका प्रवाशाने खिडकीजवळील सीटवर स्वतः बसून, शेजारील दोन सीट्सवर बॅग ठेवल्या. जेव्हा इतर प्रवाशांनी त्या जागांवर बसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सरळ सांगितले, “दोन्ही सीट आमच्या आहेत, आमचा माणूस येणार आहे, तुम्हाला जे करायचं ते करा.” त्याचा हा आग्रह आणि वर्तणूक इतर प्रवाशांना अत्यंत अपमानास्पद आणि त्रासदायक वाटली. यामुळे त्या डब्यात मोठा गोंधळ उडाला.

या संपूर्ण घटना काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. व्हिडिओ शूट होताच संबंधित ग्रुप काहीसे गप्प झाले, मात्र त्या आधीपर्यंत सामान्य प्रवाशांना जागा असूनही उभं राहून प्रवास करावा लागला. लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते आणि अशा प्रकारच्या सवयींमुळे अनेकांना रोज त्रास सहन करावा लागतो.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली असून, “लोकल ट्रेनसारख्या सार्वजनिक प्रवासात कुणाचाही खासगी हक्क असू शकत नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असून, तो झपाट्याने व्हायरल होत आहे.

या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलावीत तसेच दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे. दररोज कामावर जाणाऱ्या सामान्य प्रवाशांना अशा गैरवर्तनाचा सामना न करता शांततामय आणि सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी रेल्वे पोलिसांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : शेवटच्या विकेटआधी वाद! मोहम्मद सिराज कॅप्टन गिलवर संतापला, नेमकं काय घडलं? Video

कबुतरखाने बंदीवरुन नवाच वाद पेटला; आरोग्य की श्रद्धा?

Modi Shah Meets President: कुछ तो बडा होने वाला है! 5 ऑगस्टला कुठला मोठा निर्णय होणार?

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी; नव्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला तडा जाणार?

Glass Breaking: अचानक काच फुटणे 'हे' कोणत्या गोष्टीचे संकेत आहे?

SCROLL FOR NEXT