Mumbai Local Ticket: मुंबईकरांच्या कामाची बातमी! आता लोकलचे तिकिट व्हॉट्सअ‍ॅपवर काढा; वाचा सविस्तर

Mumbai Railway Local Ticket On WhatsApp: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईकरांना व्हॉट्सअॅपद्वारे रेल्वे तिकीट मिळणार आहे.
Mumbai Railway Ticket
Mumbai Railway TicketSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

  • आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवर रेल्वे तिकीट मिळणार आहे

  • लवकरच ही प्रक्रिया सुरु होईल

मुंबईकर आणि लोकलचं खूप जुनं नातं आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. दरम्यान, लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, यासाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअॅपद्वारे रेल्वे तिकीट काढता येणार आहे. याबाबत इच्छुक संस्थेबाबत बैठक झाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai Railway Ticket
Shirdi Railway Project : केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, शिर्डी रेल्वे मार्गासाठी ₹२३९.८० कोटी मंजूरी

आता रेल्वे तिकीट व्हॉट्सअॅपवर (Now Railway Ticket Get On Whatsapp)

भारतीय रेल्वेची तिकीट प्रणाली डिजिटल इंडियाअंतर्गत डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या माध्यमातून कॅशलेस आणि जलद तिकीट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. यामध्ये चॅट बेस तिकीट प्रणाली सुरु केली जाणार आहे.त्यामुळे आता व्हॉट्सअॅपदेखील तिकीट काढता येईल.

सध्या रेल्वेने तिकीट काढण्यासाठी २५ टक्के डिजिटल माध्यमांचा वापर करत आहे. अनेकजण अॅपद्वारे किंवा क्यूआर कोडद्वारे तिकीट काढतात. आता ही प्रणाली अधिक विकसित करण्याचे ठरवले आहे. या चॅट आधारित प्रणालीवर रेल्वेचा भर असून पश्चिम रेल्वेला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे.

Mumbai Railway Ticket
Railway: आता जनरल डब्यात मिळणार लगेच सीट, प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

मेट्रोचे तिकीतदेखी मिळते व्हॉट्सअॅपवर

मेट्रोचे तिकीटदेखील तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळते. तिकीट काउंटरवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर व्हॉट्सअॅप चॅट उघडते. त्यावर जाऊन तुम्ही कोणते तिकीट काढायचे आहे हे टाका त्यानंतर पैसे भरल्यावर तुम्हाला तिकीट मिळणार आहे.त्यानंतर आता रेल्वेचे तिकीटदेखील व्हॉट्सअॅपवर काढता यावे, यासाठी प्रणाली सुरु करणार आहे.

Mumbai Railway Ticket
Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी
Q

मुंबईकर रेल्वेचे तिकीट कसे बुक करतात?

A

मुंबईचे रेल्वे तिकीट तुम्ही तिकीट काउंटरवर जाऊन, यूटीएस अॅपद्वारे किंवा क्यूआर कोडद्वारे काढू शकतात.

Q

मुंबई लोकलचे तिकीट किती?

A

मुंबई लोकलचे तिकीट ५ रुपयांपासून सुरु होते. प्रत्येक स्थानकानुसार हे तिकीट वाढत जाते. खोपोली ते सीएसएमटी तिकीट ३० रुपये आहे.

Q

मुंबई रेल्वेचं पहिलं स्थानक कोणतं?

A

मुंबई लोकलचं पहिलं स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com