Shirdi Railway Project : केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, शिर्डी रेल्वे मार्गासाठी ₹२३९.८० कोटी मंजूरी

Central Railway Decision : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणतांबा - साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे सेवा अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
Shirdi Railway Project
Shirdi Railway Project Saam Tv
Published On

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणतांबा -साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. ज्याचा अंदाजे खर्च ₹२३९.८० कोटी आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केलेला हा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंगचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश प्रमुख विभागांमध्ये रेल्वे क्षमता वाढवणे आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार,रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणतांबा -साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे.हा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंगचा एक भाग आहे. प्रकल्प क्षेत्राच्या जवळील परिसरात अहमदनगर, पुणतांबे, शिर्डी आणि नाशिक रोड मार्गे पुणे–नाशिक नवीन जोडणाऱ्या मार्गासाठी अंतिम सर्वेक्षणाची कामे सध्या प्रगतीपथावर सुरू आहेत. हा प्रस्तावित मार्ग एक नवीन रेल्वे वाहतूक मार्ग म्हणून कार्य करणार असून, दोन अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमधील रेल्वे संपर्क अधिक बळकट करणार आहे.

Shirdi Railway Project
Mumbai To Shirdi Travel: मुंबईहून शिर्डीला कसे जायचं? जाणून घ्या सोपा मार्ग

दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणतांबा- साईनगर शिर्डी मार्गावरील ताण कमी होईल. सध्या या विभागाचा वापर केवळ १९.६६% इतका आहे. मात्र, भविष्यात दुहेरीकरणाशिवाय वापर क्षमता ७९.७०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मार्गावर ताण वाढू शकतो. पुणतांबा आणि साईनगर शिर्डी हे दोन्ही शहर आधीच रेल्वे मार्गाने जोडले गेले असून या मार्गावर अनेक ट्रेन धावत आहेत.

Shirdi Railway Project
Shirdi : साईच्या शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह | VIDEO

या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीला रेल्वेची जोडणी सुलभ होणार आहे. तसेच शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हे सोयीस्कर ठरेल.याचा फायदा केवळ भाविकांनाच नाही तर नियमित प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकरी यांनाही होईल. यामुळे शेतमालाची बाजारपेठेकडे वाहतूक अधिक सुलभ होणार असून परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com