Railway: आता जनरल डब्यात मिळणार लगेच सीट, प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Railway Gets 17000 Non AC Coaches: रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. रेल्वेला तब्बल १७ हजार नॉन एसी डबे मिळणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Railway
RailwaySaam tv
Published On

रेल्वेने सामान्य श्रेणीतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 1250 जनरल डबे वापरण्यात आले आहेत. पुढील 5 वर्षांत 17,000 बिगर वातानुकूलित जनरल/स्लीपर कोच डब्बे तयार करण्यात येणार आहे.

Railway
Shirdi Railway Project : केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, शिर्डी रेल्वे मार्गासाठी ₹२३९.८० कोटी मंजूरी

जनरल आणि बिगर वातानुकूलित स्लीपर डब्यांमधून‌ प्रवास करणाऱ्या अधिक प्रवाशांना सामावून घेण्याच्या दृष्टीने 22 मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या रचनेबाबतच्या विद्यमान धोरणात 22 डब्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये 12 (बारा) जनरल वर्गाचे आणि स्लीपर क्लास बिगर वातानुकूलित डबे आणि 08 (आठ) वातानुकूलित डब्यांची तरतूद आहे.

याशिवाय, अनारक्षित प्रवाशांच्या गरजा पूर्ण करत भारतीय रेल्वे परवडणाऱ्या प्रवासासाठी अनारक्षित बिगर वातानुकुलीत पॅसेंजर ट्रेन/मेमू/ईएमयू इत्यादी चालवते, ज्या मेल/एक्सप्रेस सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या अनारक्षित व्यवस्थे (डबे) व्यतिरिक्त असतात.

अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचा विकास, मेमू गाड्यांचे उत्पादन आणि जनरल डब्यांचा हिस्सा वाढवणे यावरून स्पष्ट होते की भारतीय रेल्वे जनरल वर्गातील प्रवासाची मागणी प्रभावीपणे पूर्ण करत आहे.

सध्याच्या बिगर वातानुकूलित डब्यांच्या उच्च वाट्याव्यतिरिक्त (एकूण कोचच्या ~70%), रेल्वे पुढील 5 वर्षांत 17,000 बिगर वातानुकूलित जनरल/स्लीपर डब्यांसाठी एक विशेष उत्पादन कार्यक्रम राबवत आहे.

भारतीय रेल्वेने पूर्णपणे बिगर वातानुकूलित अमृत भारत गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्या सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरेखित आणि उत्पादित केल्या आहेत, ज्यामुळे बिगर वातानुकूलित विभागातील प्रवाशांना जागतिक दर्जाच्या आधुनिक आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळतो. भारतीय रेल्वेने 100 अमृत भारत गाड्यांचे उत्पादन करण्याची तरतूद केली आहे.

Railway
Shirdi Railway Project : केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, शिर्डी रेल्वे मार्गासाठी ₹२३९.८० कोटी मंजूरी

उच्च गती, सुधारित सुरक्षा मानके आणि जागतिक दर्जाची सेवा ही या गाड्यांची वैशिष्ट्ये आहेत.सेवेचा खर्च, सेवेचे मूल्य, प्रवाशांना काय परवडू शकते, इतर स्पर्धात्मक मार्गांमधील स्पर्धा, सामाजिक-आर्थिक बाबी इत्यादींचा योग्य विचार करून भारतीय रेल्वे भाडे निश्चित करते.

विविध गाड्या/वर्गांचे भाडे या गाड्यांमध्ये उपलब्ध केलेल्या सुविधांवर आधारित असते. भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या रेल्वे सेवा चालवते. ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

Railway
Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com