Vilas Jamdar Arranged Meet-Up of 1989 batch school friends रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

३३ वर्षांनी शाळेतल्या मित्र-मैत्रिणींची झाली भेट; आयुष्याच्या उतारवयात विमानाची सफर

A businessman from pune is Arranged Meet-Up of 1989 batch school friends : ही सफर आम्हाला पुनर्जीवित करणारी ठरली. या काळात आम्ही मिस केलेले बालपण सुद्धा जगलो अशी सर्वांची भावना होती.

रोहिदास गाडगे

पुणे : ज्यांच्यासोबत आपण लहानाचे मोठे झालो, ज्यांच्या सहवासात बालपण एकत्र गेले अशा मित्र मैत्रिणींना तब्बल ३३ वर्षांनंतर भेटण्याचा आनंद हा अवर्णनीयच आहे. याचेच औचित्य साधत चाकण, पिंपरी-चिंचवड भागातील उद्योजक विलास जामदार (Vilas Jamdar) यांनी १९८९ मधील त्यांच्या मित्र आणि मैत्रिणींना हैद्राबादची विमानाने (Plane) सफर घडवून आणली आहे. या वर्ग मित्रांपैकी तर ३६ जणांनी प्रथमच विमानात बसण्याचा आनंद घेतला आहे. (Vilas Jamdar A businessman from pune is Arranged Meet-Up of 1989 batch school friends)

हे देखील पाहा -

देहू येथील संत तुकाराम विद्यालयात शिक्षण घेणारी १९८९ मधील बॅच कर्म-धर्म संयोगाने एकत्र आली होती. त्यानंतर सर्वांचे एकत्रित संमेलन (Meet Up) व्हावे अशी सर्वांचीच इच्छा होती. या इच्छेला बळ मिळाले ते उद्योजक विलास जामदार यांच्या वाढदिवसामुळे. जामदार यांनी सर्व मित्रांना विमानाने हैद्राबादची (Hyderabad) सफर घडवून आणली असून त्याचा सर्व खर्च जामदार यांनी स्वखुशीने केला होता.

या सफारीमध्ये रामोजी फिल्म सिटी, बिर्ला मंदिर, चारमिनार, हुसेन सागर आदी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात आली. या सहलीत जीवनात प्रथमच विमान प्रवास करणारे तब्बल ३६ मुले-मुली होत्या. प्रथमच विमानात प्रवास झाल्याने त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

आयुष्याच्या उतारवयात म्हणजे पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना अनेक व्याधींनी आम्हाला गाठायला सुरुवात केली तर काहींना गाठले होते. परंतु ही सफर आम्हाला पुनर्जीवित करणारी ठरली. या काळात आम्ही मिस केलेले बालपण सुद्धा जगलो
विलास जामदार यांच्या मित्र-मैत्रिणींची प्रतिक्रिया

औद्योगिक क्षेत्रात काम करीत असल्याने जवळपास ५५० तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम जामदार यांनी केले आहे. विलास जामदार यांनी यापूर्वी देखील त्यांच्या दानशूरपणाने समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोना काळात गरजूंना धान्य वाटप करणे, गोळ्या-औषधे वाटप करणे यासह आरोग्य विषयक सेवा पुरविण्याचे काम त्यांनी केले आहे. शैक्षणिक बाबतीत देखील जामदार यांनी मोलाचे काम केले असून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गाडकवाडी येथील शाळेला रंगकाम करण्यासह अन्य मदत केली आहे.

याशिवाय सामुदायिक विवाह सोहळ्यात जेवणाची व्यवस्था करण्यासह आर्थिक हातभार लावला आहे. निराधार मुलांच्या दवाखान्याचा खर्च करणे, गरजू मुलांच्या शैक्षणिक खर्चास हातभार लावणे, आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या मुलामुलींच्या लग्नकार्यात मदत करणे आदी कामात विलास जामदार यांनी योगदान दिले आहे. अवसरी, शिंदेगाव, वराळे, आकुर्डी, निमगाव दावडी आदी भागात गणेश मंदिरांना मदत करून धार्मिक भावना जोपासण्यास विलास जामदार मदत करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT