Ambadas Danve Criticized Prasad Lad Saam Tv
मुंबई/पुणे

Ambadas Danve News : आंदोलन करा किंवा कोर्टात जा, अंबादास दानवे वक्तव्यावर ठाम; सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Ambadas Danve Criticized Prasad Lad: सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करत अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.

Priya More

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहामध्ये भाजपचे नेते प्रसाद लाड यांना शिवी दिली होती. अंबादास दानवे यांच्या या वागण्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करत अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यासोबत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'आंदोलन करा किंवा कोर्टात जा. भाजपने आम्हाला नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही.', अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'भाजपने नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भाजपने ज्या राहुल गांधींना संसदेतून निलंबित केले होते. भाजपने १५० खासदारांना निलंबित केले होते. त्यांनी संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे मला आणि उद्धव ठाकरे यांना शिकवण्याची गरज नाही.' प्रसाद लाड यांनी अंबादास दानवेंच्या भाषेमुळे मी रात्रभर झोपू शकले नाही असे सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी 'ते राजकारणात नवीन आहेत. त्यांनी बिनधास्त झोपायला पाहिजे होते. आम्ही तर बिनधास्त झोपलो.', असे वक्तव्य केले.

विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करत अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर बोलताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, 'इथे मागणी करून काही होणार नाही. त्यांनी सभापतीकडे जावं, संसदेच्या कोर्टात जावे. जिथे जिथे जायचे आहे तिथे जावे. त्यांना काय करायचे ते करू द्या. आता त्यांना नियम कायदे आणि संविधान आठवायला लागले आहे. इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहागिरदारी, त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. आता त्यांना कायदे आणि नियमांची जाणीव झाली हे चांगले आहे.', असा टोला अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

अंबादास दानवे यांनी पुढे सांगितले की, 'मी शिवसैनिक आहे. शिवसैनिकाच्या बाण्याने मी उत्तर दिले आहे. मी माणूस आहे. समोरच्याचे काही सहन थोडी करायचे. ज्याने बोट दाखवले त्याचे बोट तोडायचे असे मी बोललो आहे. जे व्हायचे ते होईल. मी पळपूटा नाही त्यांच्यासारखा. हिंदुत्व वैगरे प्रसाद लाडसारखी लोकं शिकवतात. जे धंद्या पाण्यासाठी जिथे सत्ता आहे तिथे घुसतात. ही लोकं काय हिंदुत्व शिकवतात. त्यांना काय माहिती हिंदुत्वासाठी काय काय करावे लागते. सभागृहात त्यांनी सभापतीशी बोलले पाहिजे होते. माझ्याकडे बोट दाखवून हातवारे करून बोलण्याची गरज नाही. विरोधीपक्षनेता आक्रमकच असला पाहिजे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakshee Gandhi: थोडीशी लाजली अन् गालातच हसली; अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT