Sanjay Raut Video: लोकसभेत जनेतेने लाथाडलं, विधानसभेतही सरकारचा दाबून पराभव होईल; संजय राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut Criticized Maharashtra Government: 'लोकसभा निवडणुकीत लोकांनी या सरकारला लाथाडलं आणि नाकारलं. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचा दाबून पराभव होईल.', असा देखील हल्लाबोल संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.
Sanjay Raut Video: लोकसभेत जनेतेने लाथाडलं, विधानसभेतही सरकारचा दाबून पराभव होईल; संजय राऊतांचे टीकास्त्र
Sanjay Raut Criticized Maharashtra Government
Published On

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'ही दोन वर्षे म्हणजे फसवणुकीची होती', अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसंच, 'लोकसभा निवडणुकीत लोकांनी या सरकारला लाथाडलं आणि नाकारलं. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचा दाबून पराभव होईल.', असा देखील हल्लाबोल संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली. 'आज जाहिराती पाहिल्या. जाहिरातीवरून कळलं की महाराष्ट्रात जे चोर आणि लफंग्यांचं सरकार आलेलं आहे त्यांना दोन वर्षे पूर्ण झाली. ही दोन वर्षे म्हणजे फसवणुकीची दोन वर्षे. बेईमान घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापन केलं. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली. विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवलं. राज्यपालांनी घटनाबाह्यपद्धतीने बहुमत चाचणी घेण्याचे फर्मान सोडले. हे सरकार बनवताना सर्वांनीच बेकायदेशीर आणि घटनाबाह्य, असवैधानिक अशाप्रकारची कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि बेकायदेशीर पद्धतीने ऑक्सिजनवर टिकवलं.', अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut Video: लोकसभेत जनेतेने लाथाडलं, विधानसभेतही सरकारचा दाबून पराभव होईल; संजय राऊतांचे टीकास्त्र
VIDEO: Ajit Pawar गटाच्या 14 नगरसेवकांनी घेतली Sharad Pawar यांची भेट?

तसंच, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीचा पराभव होईल असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 'फसवणुकीतून निर्माण झालेले सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलेले आहे. त्यांचे आयुष्य दोन किंवा तीन महिन्याचं आता आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी या सरकारला लाथाडलं. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचं दाबून पराभव होईल. मिंदे काय म्हणतात यावर जग चालत नाही. चोरांचा आणि दरडेखोरांचा उठाव कधी होतो का? तुमच्यात हिम्मत होती तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या होत्या. लोकसभा निवडणुकीत मीद्यांनी जिथे-जिथे उभे राहिले तिथे लाखो रुपये देऊन मत विकत घेतली गेली. मुख्यमंत्री चार-चार दिवस हॉटेलमध्ये जाऊन कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिलेल आहे. त्यामुळे हा कसला उठाव हा पैशांचा, बेईमानीचा उठाव होता.'

Sanjay Raut Video: लोकसभेत जनेतेने लाथाडलं, विधानसभेतही सरकारचा दाबून पराभव होईल; संजय राऊतांचे टीकास्त्र
Beed Firing News : बीडच्या परळीत मध्यरात्री गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

नुकताच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावरून देखील संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'जनतेच्या पैशाने लोकांना भुलवण्याचा आणि विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांपर्यंत थेट पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न केला. या विधानसभा निवडणुकीच्या आधी जनतेच्या पैशातून मत विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न आहे ही लाच आहे.' तसंच, 'दोन वर्षांत मिंदे सरकारने काय केलं याचा हा पुरावा आहे. जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे राज्य ज्यांनी कर्जबाजारी बनवलं. महाराष्ट्राचा उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला हे आज आपल्या दोन वर्षांच्या वर्षपूर्तीच ढोल वाजवत आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे.', अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut Video: लोकसभेत जनेतेने लाथाडलं, विधानसभेतही सरकारचा दाबून पराभव होईल; संजय राऊतांचे टीकास्त्र
Pune News : पुणे मनपाची सलग चौथ्या दिवशी कारवाई ; अनधिकृत पब अन् हॉटेलवर हातोडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com