CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Vidhan Parishad Election: काँग्रेसची मते फुटली, महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

CM Eknath Shinde on Maharashtra MLC Election Result 2024: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचाच डंका वाजला असून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे, असं ते म्हणाले आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेच्या भावना गवळी (२४ मते) आणि कृपाल तुमाने (२५ मते) यांचा विजय झाला. शिवसेनेकडे ४६ मते होती. त्यात आणखी ३ मते शिवसेना उमेदवारांना मिळाली.

महायुतीतील भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना २३ मते आणि शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते पक्की होती. त्यात त्यांना ५ अतिरिक्त मते मिळाली.

काँग्रेसकडे ३२ मते होती. त्यातील २५ मते प्रज्ञा सातव यांना मिळाली. काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मते फुटल्याचा संशय असून यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

ते म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात २३ मतांसह नार्वेकर यांचा विजय झाला तर जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे ठाकरेचे नार्वेकर हे दुसऱ्या पंसतीच्या मतांनी निवडून आली आहे. त्यांना विजयासाठी प्रतिक्षा करावी. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नरेटिव्हमधून मतदारांची दिशाभूल केली होती. मविआला आलेली तात्पुरती सूज विधान परिषदेच्या निकालानंतर उतरली आहे.

निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाकडून महायुतीचे आमदार फोडणार, असा फेक नरेटिव्ह पसरवण्यात आले. मात्र महायुती अभेद्य असल्याचे आजच्या निवडणुकीने दिसून आले. शिवसेनेचे आमदार फुटणार, या ठाकरे गटाच्या वल्गना ठरल्या. काँग्रेस पक्षाची ७ मते फुटल्यानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT