Maharashtra MLC Election Result 2024: विधानपरिषदेत भाजपचा 100 टक्के निकाल, पाचही उमेदवार विजयी; कार्यकर्त्यांचा जल्लोष

All 5 Candidate Of BJP Won Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजय झाले आहेत.
Maharashtra MLC Election Result 2024: विधानपरिषदेत भाजपचा 100 टक्के निकाल, पाचही उमेदवार विजयी; कार्यकर्त्यांचा जल्लोष
BJP candidate won in Maharashtra MLC Election 2024Saam TV
Published On

विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपचा 100 टक्के निकाल लागला आहे. 11 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजपने आपले 5 उमेदवार उभे केले होते. भाजपचे 5 ही उमेदवार या निवडणुकीत विजय झाले आहेत. पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत, अशी भाजपच्या विजय उमेदवारांची नावे आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागल्यानंतर मुंडे समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील परळी आष्टी धामणगाव यासह विविध भागांमध्ये हा जल्लोष साजरा केला जातोय. फटाक्यांची आतिशबाजी करत, गुलालाची उधळण करत, कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा केला जातोय.

Maharashtra MLC Election Result 2024: विधानपरिषदेत भाजपचा 100 टक्के निकाल, पाचही उमेदवार विजयी; कार्यकर्त्यांचा जल्लोष
Sakal Survey 2024: महाराष्ट्रात भाकरी फिरणार का? महायुती की महाविकास आघाडी? वाचा EXCLUSIVE रिपोर्ट

विधानपरिषद निवडणुकीमध्ये परिणय फुके यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या नागपूरमधील हिल टॉप येथे निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ढोल ताशा वाजवत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला. यावेळी परिणय फुके यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास वडील गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे बीड लोकसभेतून निवडून आले. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र काही दिवसांनी त्यांचा रस्ता अपघातात अचानक मृत्यू झाला. यानंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या विजयी झाल्या. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता तब्बल 5 वर्षांनी त्या पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

Maharashtra MLC Election Result 2024: विधानपरिषदेत भाजपचा 100 टक्के निकाल, पाचही उमेदवार विजयी; कार्यकर्त्यांचा जल्लोष
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पूर्ण, १२ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; कधी लागणार निकाल?

सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक माढा येथून लढवली होती. मात्र यात ते पराभूत झाले. यानंतर 10 जून 2016 रोजी ते विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. 8 जुलै रोजी त्यांचा महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्री परिषदेत समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे कृषी, फलोत्पादन आणि पणन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपच्या वतीने ते पुन्हा एकदा विधानपरिषदेवर निवडून आले आहेत.

परिणय फुके

परिणय फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. फुके यांचा 2019 च्या निवडणुकीत साकोली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. याआधी ते फडणवीस सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

योगेश टिळेकर

योगेश टिळेकर 2019 च्या निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. ते माळी समाजातून येतात. त्याचाही या निवडणुकीत विजय झाला आहे.

अमित गोरखे

मांतग समाजातील नेते अमित गोरखे यांनाही भाजपने विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यामध्ये त्यांचा विजयी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com