Pune Porsche Accident Case 
मुंबई/पुणे

VIDEO: पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीची बाल निरीक्षणगृहातून सुटका

Pune Porsche Accident Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने जामीन मंजूर झाल्यानंतर आज संध्याकाळी बाल निरीक्षण गृहातून सुटका झालीय.

Bharat Jadhav

कल्याणीनगर मधील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल निरीक्षणगृहातून सुटका झालीय. जवळपास ३५ दिवसानंतर या अल्पवयीन मुलाची सुटका झालीय. बाल निरीक्षणगृहातून बाहेर पडताना त्याने डोक्यावर टोपी, तोंडावर मास्क घातला होता. अल्पवयीन आरोपी बाहेर पडताना बाल न्याय मंडळाने परिसरातील लाईट बंद केले होते.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने जामीन मंजूर केलाय. मुंबई हायकार्टाने या मुलाला दिलासा दिला आहे. या मुलाची कस्टडी त्याच्या आत्याकडे देण्यात आलीय. त्यानंतर आज संध्याकाळी बाल निरीक्षणगृहातून या मुलाची सुटका झालीय. कोर्टाच्या निर्देशानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरुणाचे नातेवाईक संध्याकाळी पुन्हा बाल न्याय मंडळात दाखल झाले. त्यानंतर तेथील औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आरोपीला सोडण्यात आलं. यावेळी अल्पवयीन मुलाचा चेहरा दिसून नये, म्हणून बाल न्याय मंडळाने लाईट बंद केले होते. तर अल्पवयीन मुलाने डोक्यावर टोपी घातली होती आणि चेहऱ्यावर मास्क लावला होता.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडले होतं. या दोघांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील रस्त्यावर भरधाव कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. मात्र हा पुणे पोलिसांसाठी धक्का मानला जात आहे. जामिनानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. जामीन देण्याचा निर्णय दिल्यानंतर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करावे असे निर्देश कोर्टाने दिले होते.

मुलाची आत्या पूजा यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारली. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने अल्पवयीन मुलाची कस्टडी त्याच्या आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले. अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केल्यानंतर बालसुधारगृहात पाठवणे अनधिकृत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. सुनावणीत बाल न्याय मंडळाने जामिनानंतरही अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, कोर्टाच्या या निर्देशानंतर बाल सुधारगृहाने अल्पवयीन मुलाची सुटका केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Maharashtra Tourism: महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करताय, मग 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT