Pune Hit and Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; राज्य सरकार कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार

Pune Hit and Run Case update : हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून या राज्य सराकर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकार कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
 पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; राज्य सरकार कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार
Pune Hit and Run CaseSaam tv
Published On

पुणे : पुणे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकार या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणातील मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर राज्य सरकार या मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडले. त्यानंतर अपघातस्थळावरून पळ काढला. या भीषण अपघातात दोन तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये अश्विनी कोष्टा, अनिस अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामधील दोघे तरुण-तरुणी मूळचे राजस्थानचे होते. कल्याणीनगर भागात रात्री अडीच वाजता हा अपघात झाला. या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

 पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; राज्य सरकार कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार
Pune News: 'पुण्यातील पब संस्कृती बंद करा', पतीत पावन संघटना आक्रमक; एल-थ्री बारची तोडफोड; पाहा VIDEO

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन तरुणाला गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा आणि आईला अटक केली आहे. तसेच अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करणाऱ्यां ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

याच पुणे हिट अँड रन प्रकरणाची नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मृत तरुण-तरुणीच्या पालकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही कायदेशीर पावलं उचलावी लागण्यास राज्य सराकर तेही करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांना दिले.

 पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; राज्य सरकार कायदेशीर कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार
Pune Drug News : FC रोड वरील L-3 बारची पतित पावन संघटनेकडून तोडफोड, पब संस्कृतीला विरोध

या प्रकरणाती अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दोन्ही कुटुबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com