Pune News: 'पुण्यातील पब संस्कृती बंद करा', पतीत पावन संघटना आक्रमक; एल-थ्री बारची तोडफोड; पाहा VIDEO

Pune narcotics Case Latest News: विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एल३ बारमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आले होते.
Pune News: 'पुण्यातील पब संस्कृती बंद करा',  पतीत पावन संघटना आक्रमक; एल-थ्री बारची तोडफोड; पाहा VIDEO
Pune narcotics Case Latest News:Saamtv
Published On

सागर आव्हाड, पुणे|ता. २४ जून २०२४

पुणे शहरातील ड्रग्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या एल ३ बारमध्ये काही तरुण ड्रग्स चे सेवन करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. याप्रकरणानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा बारही सिल केला होता. याप्रकरणी पतीत पावन संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून या बारची तोडफोड करण्यात आली आहे.

विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एफसी रोडवर असलेल्या एल३ बारमध्ये अल्पवयीन मुले ड्रग्ज घेतानाचे व्हिडीओ समोर आले होते. याप्रकरणी विरोधकांसह विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आज शहरातील पतीत पावन संघटनेने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत एल- थ्री बारची तोडफोड केली. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या तोडफोडीनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Pune News: 'पुण्यातील पब संस्कृती बंद करा',  पतीत पावन संघटना आक्रमक; एल-थ्री बारची तोडफोड; पाहा VIDEO
NCP Symbol Crisis: विधानसभेला चिन्हाचा घोळ नकोच! 'पिपाणी' विरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव; पाहा VIDEO

"आपल्या सांस्कृतिक पुणे शहरात पब संस्कृती चालू देणार नाही. पुण्यातील पब संस्कृती बंद करा. गणेश उत्सवाचा सांस्कृतिक शहर पुणे आहे. गणेश उत्सवाच्या स्पीकर्सला बंदी आणि पुण्यात रात्री पब चालतात. पुण्यात नेमकं चाललय तरी काय? याचा निषेध पतीत पावन संघटना करणार असल्याचा इशारा पतीत पावन संघटनेचे पुणे अध्यक्ष स्वप्निल नाईक यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com