Vasant More  Saam TV
मुंबई/पुणे

Vasant More: मनसेला सोडचिठ्ठी देताच वसंत मोरेंना सर्वच पक्षांकडून ऑफर; नेमकं कुणासोबत जाणार? थेट सांगूनच टाकलं...

Pune Vasant More News: मनसेला सोडचिठ्ठी देताच काही वेळातच वसंत मोरे यांना सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या ऑफर आल्या आहेत. स्वत: वसंत मोरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Satish Daud

Vasant More Pune News

मनसेचे पुणे शहरातील माजी फायब्रँड नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी (ता. १२) आपल्याकडील सर्वच पदांचा राजीनामा दिला. साहेब मला माफ करा, अशी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. इतकंच नाही, तर मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेत आपल्या मनातील खदखद देखील बोलून दाखवली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी देताच काही वेळातच वसंत मोरे (Vasant More) यांना सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या ऑफर आल्या आहेत. स्वत: वसंत मोरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे नेमके कोणत्या पक्षात जाणार? अशा चर्चा पुणे शहरात सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर पुणे शहरात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी म्हणून वसंत मोरे मनसेचं काम करीत होते. पुण्यात मनसेच्या विस्तारात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. (Latest Marathi News)

वसंत मोरे नेमके कोणत्या पक्षात जाणार?

"मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट, ठाकरे गट तसेच काँग्रेस यासारख्या पक्षांकडून आपल्याला फोन आले", अशी माहिती वसंत मोरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली. तसेच राज ठाकरे यांचा देखील मला फोन आला होता, पण तो मी उचलला नाही, असंही मोरे यांनी सांगितलं आहे.

मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर तुम्ही कोणत्या पक्षात जाणार? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, मला ज्या राजकीय पक्षातील नेत्यांचे फोन आले, त्यांना मी एकच सांगितलं की मी आताच लगेच कुठलीही राजकीय भूमिका जाहीर करणार नाही.

"कारण, मला ज्या लोकांमुळे मनसेला सोडचिठ्ठी द्यावी लागली, ती लोक अजूनही शहाणी होत नाहीये. अजूनही ते रात्री अपरात्री फोन करून माझ्यासोबत राजीनामे देणाऱ्या कार्यकर्त्यांना फोन करून धमकावत आहेत. या सर्व गोष्टीतून मला स्थिरावण्यासाठी अजून एक दोन दिवस लागतील", असं वसंत मोरे म्हणाले.

"येत्या दोन ते तीन दिवसांत मी याबाबत निर्णय घेईल. मला शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन आला होता. मी त्यांचे फोनवरून स्टेटमेंट देखील पाहिलं. एवढ्या मोठ्या माणसाने माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या राजीनाम्याची दखल घेणं हे मी माझे भाग्यच समजतो", असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

SCROLL FOR NEXT