वसई-विरारला ओमीक्रॉनने गाठलंच; ओमीक्रॉनचा १ रुग्ण आढळला, उपचार सुरु... Saam Tv
मुंबई/पुणे

वसई-विरारला ओमीक्रॉनने गाठलंच; ओमीक्रॉनचा १ रुग्ण आढळला, उपचार सुरु...

वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ डिसेंबर, २०२१ रोजी ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार: शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ डिसेंबर, २०२१ रोजी ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. सदर रुग्ण हा मुंबई येथे शुटींगच्या ठिकाणी विद्युत विभागात काम करीत असून दिनांक ०३ डिसेंबर २०२१ रोजी रुग्ण हा भांडूप येथे शुटींगच्या कामानिमित्त गेला असता त्या ठिकाणी रुग्णाची कोविड चाचणी (RTPCR) करण्यात आली. चाचणीसाठी घेतलेले सॅम्पल हे कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई येथे तपासणी करिता पाठविण्यात आले व तेथे सदर रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. (Vasai-Virar reached by Omicron; 1 Omicron patient found, treatment started)

हे देखील पहा-

परंतु रुग्णाला कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्याला राहत्या घरी विलगीकरण (होम आयसोलेशन) मध्ये ठेवण्यात आले होते. रुग्णाचे तपासणीसाठी घेण्यात आलेले सॅम्पल्स हे कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई येथून एन आय व्ही (NIV), पुणे येथे Analysis साठी पाठविण्यात आले. एन आय व्ही, पुणे येथील Analysis मध्ये सदर रुग्ण ओमीक्रॉन (Omicron Variant) पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिनांक १४ डिसेंबर, २०२१ रोजी महानगरपालिकेला प्राप्त झाला.

सदरील अहवाल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळताच रुग्णाची प्रथमत: अॅन्टीजन चाचणी करण्यात आली असून सदर चाचणी कोविड निगेटिव्ह आलेली आहे. तसेच रुग्णाची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीही करण्यात आली असून त्याचा अहवाल दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी सकाळी प्राप्त होणार आहे. सध्यस्थितीत सदर रुग्ण सुस्थितीत असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. तरी सदर रुग्णास महानगरपालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले असल्याचे वसई-विरार (Vasai - Virar) महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

SCROLL FOR NEXT