Vasai-Virar Result Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai-Virar Result: वसई-विरारमध्ये भाजपला जोरदार झटका, बविआची एकहाती सत्ता; साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला

Bahujan Vikas Aghadi: वसई-विरार महानगर पालिका निवडणुकीमध्ये बविआला एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. बविआने भाजपला जोरदार धक्का दिला. बविआचे ७१ उमेदवार विजयी झाले. या महापालिकेत बविआचा महापौर होणार आहे.

Priya More

Summary -

  • वसई-विरारमध्ये बविआने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली

  • भाजपला बविआने मोठा धक्का दिला

  • साम टीव्हीचा एक्झिट पोल अचूक ठरला

  • हितेंद्र ठाकूर यांचा वसई-विरारवरील दबदबा पुन्हा सिद्ध झाला

मनोज तांबे, वसई-विरार

वसई-विरार महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला. या निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला. याठिकाणी बहुजन विकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली. हितेंद्र ठाकूर यांच्य पक्षाने बहुमताचा आकडा पार करत वसई-विरार महानगर पालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला. बहुजन विकास आघाडीचे 71 उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपचे 43 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार विजयी झाला.

वसई-विरार महानगर पालिकेत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं. साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला. 115 जागांपैकी 71 जागांवर बहुजन विकास आघाडीने तर भाजपने 43 जागा जिंकल्या आहेत. वसई विरार महापालिकेचा गड हितेंद्र ठाकूर यांनी कायम राखला. या विजयानंतर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याठिकाणी इतर राजकीय पक्षांना एकही खातं उघडता आलं नाही.

वसई-विरार महानगर पालिका निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या वबिआने ११५ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. भाजपने ९५ ठिकाणी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. शिंदेसेनेने २७, काँग्रेने १० आणि शिवसेना ठाकरे गटाने ८९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत बविआ आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर झाली. बविआने या महानगर पालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले.

दरम्यान, वसई- विरार महापालिकेत २९ वॉर्ड आहेत. यामध्ये ११५ सदस्य संख्या आहे. यापैकी ५८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर ५७ जागा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी ५ आणि अनुसूचीत जमातीसाठी ५ जागा आहेत. तर यात प्रत्येकी २ महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच ७४ जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

वसई- विरार महानगरपालिकेमध्ये कोणत्या वॉर्डमधून कोणता पक्ष विजयी -

बहुजन विकास आघाडी -

प्रभाग क्रमांक - 1, 3, 4, 6-01, 7, 8, 9, 12, 13, 14, 19, 20, 21-03, 24, 25, 26, 27, 28, 29 (चारचे पॅनल विजयी)

भाजप -

प्रभाग क्रमांक - 2, 5, 6-03 ,11, 10, 15, 16, 17, 18, 21-01, 22, 23 (चारचे पॅनल विजयी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Acid Attack: पुन्हा अ‍ॅसिड हल्ला! दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड सदृश रसायन

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT