
पुढील महिन्यापासून बँकेच्या नियमात बदल होणार आहे. क्रेडिट कार्ड ते एलपीजीच्या नियमात बदल केली जातात. या महिन्यापासून महिलांना आर्थिक लाभ होणार आहे. वसई-विरार महानगरपालिकेने महिलांना आनंदाची बातमी दिलीय. येत्या १ जूनपासून महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय वसई-विरार महानगरपालिकेने घेतलाय. ही योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याची माहिती वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिलीय.
वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत एकूण १३० बस चालतात. यापैकी ९० बस कंत्राटदारांमार्फत चालवल्या जातात. उर्वरित ४० बस महानगरपालिकेद्वारे चालवल्या जातात. या १३० बस वसई-विरार परिसरातील ३७ प्रमुख मार्गांवर धावतात. काही इतर नागरी वाहतूक सेवा महिलांना तिकीट भाड्यात सवलत देत आहेत. महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार १ जूनपासून महिलांना अर्ध्या दराने तिकिटे देण्याचा निर्णय घेतलाय, असे अनिल कुमार पवार म्हणाले.
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी अधिकारी आणि मंत्र्यांची भेट घेऊन आणि व्हीव्हीएमसी बसमध्ये महिलांना भाडे सवलत देण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. महानगरपालिकेच्या बसमधून प्रवास करताना महिलांना भाड्यात सवलत देणे, हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सवलतीचा फायदा या भागातील हजारो महिला प्रवाशांना होईल
. ज्या महिला दररोज काम, शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात, त्यांना मोठा फायदा होणार आहे. या उपक्रमामुळे आर्थिक दिलासासह महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशी मागणी केलीय.
जून महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. सरकार ईपीएफओची नवीन आवृत्ती 3.0 लाँच करणार आहे. जूनपासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू केले जाण्याची शक्यता आहे. ऑटो-डेबिट फेल्युअरवर 2% दंड आकारला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.