Dombivli crime: डोंबिवलीत लोकलमध्ये मोबाईलची चोरी, हाताला फटका मारून चोरटा मोबाईल घेऊन पसार

Dombivli Train mobile snatcher: डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन स्लो लोकलमध्ये प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
Local News
Local NewsSaam digital
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन स्लो लोकलमध्ये घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सुमित सिंह असे आरोपीचे नाव आहे. प्रवासी जनरल डब्याच्या दरवाजात उभा होता. यादरम्यान आरोपी आला आणि त्याने प्रवाशाच्या हातावर जोरदार फटका मारून मोबाईल घेऊन पळ काढला. ही घटना काल सायंकाळी ७:४१ वाजता डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन स्लो लोकलमध्ये घडली.

Local News
BJP Leader: भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ, जमिनीच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण; CCTV व्हायरल

घटनेच्या वेळी गस्तीवर असलेल्या डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या पथकाने तत्काळ पाठलाग करून आरोपीला रेल्वे ट्रॅकवर पकडले. त्याच्याकडे चोरी गेलेला मोबाईल सापडला असून, पोलिसांनी १६,५०० रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे पोलिसांनी सतर्कतेने कारवाई केल्यामुळे चोरट्याला अटक करण्यात यश आले आहे.

Local News
Accident News: भीषण! रेणुका देवीचं दर्शन घेऊन परतताना घात झाला; भाविकांची कार खोल दरीत कोसळली

धाराशिवमध्ये तरूणांची हुल्लडबाजी

धाराशिव शहरातील भानुनगर ते सेंट्रल बिल्डिंग रस्त्यावर काही तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी कारमधून जात हुल्लडबाजी केली आहे. या तरुणांनी रस्त्यावर विचित्र हावभाव करत कपडे काढून अंगप्रदर्शन केले, ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून, पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊन तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Local News
Crime News: गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेला, शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या; ९ तास दार बंदच, शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com