Accident News: भीषण! रेणुका देवीचं दर्शन घेऊन परतताना घात झाला; भाविकांची कार खोल दरीत कोसळली

Nanded Car Accident: रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतत असताना भाविकांची एक कार ४० फूट दरीत कोसळली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून, कारमधील सहा भाविक जखमी झाले आहेत.
Nanded
NandedSaam
Published On

नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील घाटात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. रेणुका मातेचं दर्शन घेऊन परतत असताना एका कारचा भीषण अपघात घडला. रात्रीच्या सुमारास चालकाला घाटात वळणाचा अंदाज न आल्याने कार थेट ४० फूट दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत कारमधील सहा भाविक जखमी झाले असून, सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना मंगरूळ येथून आलेल्या भाविकांच्या कारला घडली. रेणुका मातेच्या दर्शनासाठी सहा भाविक कारमधून आले होते. दरम्यान, हे भाविक दर्शन आटोपून परत जात होते. मात्र, घाटाच्या एका तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने गाडी उलटून एका ठिकाणी अडकली, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

Nanded
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीच्या जवळच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला, आतापर्यंत १९ जणांची चौकशी, पुणे पोलीस अ‍ॅक्शनमोडवर

हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला. यामुळे मदतीसाठी काही वेळ विलंब लागला. मात्र, ग्रामस्थांनी कारमधील सहा जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना तातडीने रूग्णालयात नेले. कारमधील जखमी भाविकांवर तत्काळ उपचार करण्यात आले असून, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

Nanded
Gokul Milk: कोल्हापूरचे राजकारण रात्रीत फिरले, हसन मुश्रीफांचा मुलगा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक अपघाताच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com