Mira Bhayandar Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Mira Bhayandar News: खाडीत जोडप्याने मारली उडी, नवरा वाचला; बायको बेपत्ता

Couple Jump In Creek: शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अहमदाबादवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ब्रिजवरून वरसावे खाडीत एका जोडप्याने उडी मारली.

Priya More

मीरा भाईंदरमधील वरसावे खाडीत एका महिलेनी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेला वाचवण्यासाठी तिच्या पतीने देखील खाडीमध्ये उडी मारली. पत्नी बुडाली असून तिच्या पतीला वाचवण्यात यश आले असून त्याला बाहेर काढण्यात आले आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती वादातून या महिलेने खाडीमध्ये उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अहमदाबादवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ब्रिजवरून वरसावे खाडीत एका जोडप्याने उडी मारली. शशिकला यादव (२८ वर्षे) आणि दिनेश यादव (३२ वर्षे) असं या पती-पत्नींची नावं आहे. शशिकला यादव आणि दिनेश यादव हे दोघे नायगाववरून या ब्रिजवर पोहोचले. अचानक या महिलेने वरसावे खाडीमध्ये उडी मारली. तिला वाचवण्यासाठी तिचा पती दिनेश यादव यांनी देखील उडी मारली.

महामार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी मिरा-भाईंदर अग्निशामक दल, काशिगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. स्पीड बोटच्या सहाय्याने दिनेश यादव याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र महिलेला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे ती खाडीमध्ये बुडाली.

अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती काशिगाव पोलिसांनी दिली. हे पती-पत्नी नायगावमध्ये राहणारे असून घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास काशिगाव पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT