Nagpur Crime : २० वर्षांनंतरही घरात पाळणा हलेना, पत्नीला संपवले आणि मृतदेहाजवळ तब्बल सहा तास…

Nagpur Crime News : पत्नीला संपवल्यानंतर पती सहा तास मृतदेहाशेजारी बसून होता. त्यानेच फोन करुन नातेवाईकांना घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली.
MP Crime
Crime Saam tv
Published On

Nagpur Crime News : लग्नाला २० वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्यानं संतापलेल्या पतीनं पत्नीची डोक्यात मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमधील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हत्येप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सबीरा वर्मा असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर बाबूलाल वर्मा असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लग्नाला 20 वर्षे लोटूनही मूल होत नसल्याच्या नैराश्यातून पतीने पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करत तिचा खून केल्याची घटना कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. कळमना पोलिसांनी याप्रकरणी सबीरा वर्मा हिच्या हत्येप्रकरणी पती बाबूलाल वर्मा याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नीला संपवल्यानंतर बाबूलाल सहा तास मृतदेहाजवळ बसून होता. त्यानेच नातेवाईकांना फोन करुन पत्नीला संपवल्याचं सांगितले. याप्रकरणामुळे नागपूर हादरले आहे.

MP Crime
Jawhar News : आश्रम शाळेतील बारावीच्या विद्यार्थीनीनं संपवले जीवन; २ महिन्यांत १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

डोक्यात लाकडी दांड्याने हल्ला करत निर्घून खून केला -

वर्मा दाम्पत्य हे मूळचे छत्तीसगड येथील असून कामाच्या शोधात ते नागपुरात आले होते. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात नंतर बाबूलालने दारू प्यायला सुरुवात केली होती. दररोज तो पत्नीला मारहाणही करत होता. घटनेच्या दिवशी त्याने दुपारच्या सुमारास पत्नी सोबत वाद घातला आणि वाद विकोपाला जाऊन त्याने चक्क लाकडी दांड्याने मारहाण करत पत्नीला रक्तबंबाळ केले. यात तिचा मृत्यू झाला.

MP Crime
Shocking News : प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी, प्रेयसी संतापली; प्रियकराच्या पत्नीचा गळाच चिरला

हत्या केल्याची माहिती फोनवरुन नातेवाईकांना दिली -

या घटनेनंतर बाबूलालने नातेवाईकाला पत्नीची हत्या केल्याची माहिती फोनवरून दिली. जवळपास सहा तास तो मृतदेह जवळच बसून राहिला. नातेवाईक आले, तेव्हा घराचे दार बंद करून होता. खिडकीतून पाहून हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी माहिती देताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी तात्काळ पती बाबूलाल वर्मावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com