Vanraj Andekar Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar Case: वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट, मध्यप्रदेशातील कनेक्शन उघड

Pune Police: वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या २१ वर पोहचली आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात (Vanraj Andekar Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणात मध्यप्रदेश कनेक्शन उघड झाले आहे. वनराज यांच्या हत्येसाठी मध्यप्रदेशमधून पिस्तुल पुरवण्यात आले होते. हे पिस्तुल आणण्यासाठी मदत करणाऱ्याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या हत्याप्रकरणात याआधीच पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. यामध्ये वनराज आंदेकर यांच्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यास मदत करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यांनी १ ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. अभिषेक ऊर्फ आबा नारायण खोंड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अभिषेक शिवणे येथील लक्ष्मी गार्डन सोसायटीमध्ये राहतो. अभिषेकच्या अटकेनंतर या गुन्‍ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा आता २१ वर गेला आहे. यासह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

वनराज आंदेकर यांची हत्या टोळी वादातून झाला असून त्यासाठी वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्यासाठी आरोपी अभिषेक खोंड याने आरोपी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. हत्या झाल्यावर अभिषेक खोंड फरार झाला होता. या कालावधीत त्याला कोणी आश्रय दिला?, कोणी आर्थिक मदत केली?, त्याने आणखी काही पिस्तुले आणली आहेत का?, त्याची कोणाला विक्री केली आहे का? या बाबींचा तपास पोलिसांना करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT