Crime Case : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीची हत्या, फ्रिजमध्ये ठेवलं मृतदेहाचे ५० तुकडे

Bengaluru Mahalakshmi Case : राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) बेंगळुरू पोलिसांना महालक्ष्मीच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
Crime Case : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीची हत्या, फ्रिजमध्ये ठेवलं मृतदेहाचे ५० तुकडे
Bengaluru Mahalakshmi Case HT
Published On

बंगळुरूमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक २९ वर्षीय महालक्ष्मी हत्येची बातमी आली होती. या हत्येप्रकरणात नवी अपडेट समोर आलीय. पोलिसांना महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ५९ तुकडे फ्रिजमध्ये सापडले होते. याबबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतलीय. आरोपींना त्वरीत गजाआड करावे, असे निर्देश आयोगाने पोलिसांनी दिलेत.

या घटनेने श्रध्दा वालकर हत्याकांडाची आठवण झाली. महालक्ष्मीच्या हत्येची घटना शनिवारी समोर आली. महालक्ष्मीचा मृतदेह बेंगळुरूमधील व्यालीकावल येथील तिच्या फ्लॅटमधील रेफ्रिजरेटरमध्ये सापडला होता. दरम्यान पोलिसांनी या हत्येतील संशयीत आरोपीची ओळख पटवलीय. ओडिसामधील एका व्यक्तीने महालक्ष्मीची हत्या केली असून तो तिचा प्रियकर होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. संशयीत प्रियकर नोकरीसाठी बंगरुळुत आला होता. आम्ही या हत्येप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करू. जे कोणी यात सहभागी असतील त्यांना अटक केली जाईल.

या हत्याकांडाची सर्व माहिती आणि पुरावे गोळा केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले, संशयीत आरोपीची ओळख पटलीय, तो स्थानिक नसून बाहेरचा आहे. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीला आधीच ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वरा म्हणाले, “पोलीस संशयितांना आणत असून त्यांची चौकशी करत आहेत.

जर कोणी (गुन्ह्याची) कबुली दिली तर त्यांना ताब्यात घेतले जाईल. मृत महिलेच्या पतीने तिच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केलाय. महिलेच्या मारेकरीला पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली आहेत. हे तपास पथके भारताच्या विविध भागात आरोपीचा शोध घेत आहेत. तर महालक्ष्मीच्या घराच्यांनी न्याय मिळावा आणि आरोपीला अटक करावी, अशी मागणी केलीय.

या हत्येची दखल महिला आयोगाने घेतली असून राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) बेंगळुरू पोलिसांना महालक्ष्मीच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com